Devendra Fadnavis Shivendrasinharaje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP च्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप करणार शिवेंद्रराजेंना मंत्री

संदीप गाडवे

महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री होते.

केळघर (सातारा) : राज्यात प्रचंड नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या असून रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Uddhav Thackeray Resigns) दिल्यानं भाजपचा सरकार (BJP Government) स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. सातारा विधानसभा मतदार संघातून (Satara Assembly Constituency) विधानसभेला विक्रमी मतांनी निवडून आलेले भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा आग्रह सातारा-जावळी मतदारसंघातून होत आहे.

सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपच्या सरकारमध्ये महत्वाच्या मंत्रीपदावर येत्या काही दिवसांत दिसतील, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत. शिवेंद्रसिंहराजे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे व मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विक्रमी विकासकामे मंजूर करून सातारा-जावळी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री होते. आता भाजपचे सरकार स्थापन होत असताना सातारा जिल्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारात आमदार भोसले हे गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत. स्वच्छ प्रतिमा, तळागाळात जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद दिल्यास सातारा जिल्ह्यात भाजपला निश्चित उभारी मिळणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते व जनता आमदार भोसले यांच्या मंत्रीपदाकडं आस लावून आहे. सातारा-जावळी तालुक्यातील रखडलेल्या व प्रलंबित प्रश्नांना शिवेंद्रसिंहराजे मंत्री झाल्यास न्याय देतील व हे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास तालुक्यातील जनतेला आहे.

सातारा जिल्ह्यातून भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. जयकुमार गोरे (Jayakumar Gore) व शिवेंद्रसिंहराजे भोसले. आताच्या घडीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं नाव मंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी शिवेंद्रसिंहराजे यांचे सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे (Satara-Jawali Assembly Constituency) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मंत्रीपदाबाबत जनता व कार्यकर्ते आशावादी आहे. भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्ते व जनतेच्या आग्रही मागणीचा विचार करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशी मागणी सातारा-जावळी तालुक्यातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT