Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'सिल्व्हर ओक'वर ठरणार अध्यक्षपदाचा दावेदार

उमेश बांबरे

अध्यक्षपदावरून सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या (Satara District Bank Election) अध्यक्षपदावरून सध्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मागील वेळी बॅंक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी काल मुंबईत (Mumbai) जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक Silver Oak Mumbai (मुंबई) या निवासस्थानी भेट घेऊन बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केलीय.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे सध्या भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. सध्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्ष पदावर संधी मिळावी म्हणून काही संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केलीय. यामध्ये वाईचे नेते नितीन लक्ष्मणराव पाटील (Nitin Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर काल (गुरूवारी) सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती.

शरद पवारांकडून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्ष पदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळं दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितलं होतं. आज दुसऱ्याच दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सकाळी दहा वाजता भेट घेतली. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा इच्छुक असून मला पुन्हा संधी द्यावी, ही मागणी केली. दरम्यान, शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कौतुक करताना कै. अभयसिंहराजे भोसले (Abhaysinghraje Bhosle) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहात, असे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नितीन पाटलांचं नाव आघाडीवर

यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेत राजकारण नसल्याने बँक चांगली चालली आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली होती. आता पुन्हा संधी दिली तर अध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यावर तुम्ही अजितला भेटला का, असं विचारले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी अजित दादांची कालच भेट घेतली असून यामध्ये बँकेविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मी अजित व रामराजेंशी बोलतो, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार शिवेंद्रसिंहराजेंच्या विनंतीला मान्यता देणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सध्या वाईचे नेते नितीन पाटील (Nitin Patil) यांचं नाव आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT