आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार आहे. दरम्यान, यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता भाजपाने कट केला आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रियी दिली आहे. आज ते मुंबईत बोलत होते. (MLC Election 2022 Latest Update)
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट केला आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजपाकडून उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.
10 विधान परिषेदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. या पाच उमेदवारांचे अर्ज आता भरले जाणार आहेत. आमच्या पार्टीत सर्वजण कोरी पाकीट असतो. जो पत्ता लिहील तिथे जावं लागतं. त्यामुळे राजकारणात चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते आणि निर्णय हा शेवटी पक्षाचे असतात. त्यामुळे केंद्राने केलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी त्याचे पालन करायचे असते. पंकजा ताई यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्राने काही भविष्यातील विचार करुन हा निर्णय घेतला असावा असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ईच्छा व्यक्त करणे आणि नाराजी व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र भाजपातील नाराजी लगेच भरली जाते. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आणखीनही कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यसभा तसंच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होती. मात्र राज्यसभेतही पंकजा यांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.