Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

पवारांचं दगडूशेठ गणपती दर्शन मनसेला खटकलं; म्हणाले माहित असूनही...

शरद पवारांनी काल दगडूशेठ गणपतीचं मुखदर्शन घेतलं

दत्ता लवांडे

पुणे : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर भिडे वाड्यालाही त्यांनी भेट दिली. दगडूशेठ गणपतीच्या मंदिराचे मुखदर्शन त्यांनी यावेळी घेतले. मांसाहार केल्यामुळे बाहेरून दर्शन घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

(MNS Amey Khopkar ON Sharad Pawar)

मनसेचे अमेय खोपकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवरांना टोला लावला आहे. "पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे" असा टोला अमेय खोपकर यांनी शरद पवारांना लावला आहे.

दरम्यान काल शरद पवार हे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार असल्यामुळे सर्वजणांनी तयारी केली होती. पण शरद पवार हे मंदिराच्या आत गेले नाहीत. मांसाहार केल्यामुळे ते मंदिराच्या आत गेले नाहीत असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. त्याआधी त्यांनी भिडे वाड्याची पाहणी केली होती. त्यांच्या या मुखदर्शनाने राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT