mns latest news esakal
महाराष्ट्र बातम्या

'...मग महाविकास आघाडीत काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार का?'

पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं वक्तव्य शिवसेवा खासदार संजय राऊत करतात

सकाळ डिजिटल टीम

पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं वक्तव्य शिवसेवा खासदार संजय राऊत करतात

सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकांते वारे वाहत आहेत. नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा खासदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत असल्याने जूनमध्ये निवडणुकांची रणधुमाळी असणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने (Congress) बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपानेही आपले उमेदवार निश्चित केले असून यावरून दावे प्रतिदावे सुरु आहेत. (mns latest political news)

निवडणुकांसाची मोर्चेबांधणी सुरु झाली असून आता मनसेकडून एक वेगळी बातमी समोर येत आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं वक्तव्य विश्वप्रवक्ते शिवसेवा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) करतात. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचा होऊ दे यासाठी खासदार सुप्रिया सुळे नवस फेडणार, असे सुरु असताना आघाडीतील काँग्रेस काय मग फक्त सतरंज्या उचलणार का? असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.

https://twitter.com/GajananKaleMNS/status/1531480008975613952?s=20&t=zpCmssqFCV-LKIOXTH-Wmwराज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नेत्यांमध्ये नाराजी आहे. यावर तरुण नेतृत्वाला संधी दिल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पक्षाच्या निर्णयाची पाठराखण केली आहे. परंतु यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोलल जात आहे. राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर होताच राज्यातील उमेदवार देण्याची मागणी काही नेत्यांनी केली. काँग्रेसचे महासचिव अशिष देशमुख यांनीही पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्यांच त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, देशात अनेक स्थानिक पक्ष आहेत. ते आपापल्या क्षेत्रात प्रबळ आहेत. पण काँग्रेसचे अस्तित्व देशभरात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा काँग्रेसशिवाय आघाडी अशक्य असल्याचे सांगितले. आघाडीच्या नेतृत्वाचासुद्धा प्रश्न नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदी जो निवडून येईल, तोच आघाडीचा नैसर्गिक दावेदार राहील, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT