Raj Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Latest News : "सध्या विरोधीपक्ष कोण? आमचा एकच पक्ष..."; राज ठाकरेंचं राजकीय परिस्थितीवर भाष्य

रोहित कणसे

Ajit Pawar Update : राज्यात सध्या विधघानसभेचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बंड करून सत्तेत सामील झाल्यानंतर विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपद रिक्त आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि भाजपच्या युतीवर देखील यावेळी जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांना सध्या विरोधीपक्ष नेता नाहीये याबद्दल विचारले असता, त्यांनी आधी विरोधीपक्ष पहिलं सांगा? असा प्रतिप्रश्न केला. राज्यात सध्या विरोधीपक्षच दिसत नसल्याचे अधोरेखित करत ते म्हणाले की, सध्या आमचा एकच पक्ष विरोधीपक्ष दिसतोय, बाकी सगळ्यांचेच एकमेकांशी लागेबांधे आहेत.

अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्या तासात मी ट्वीट केलं होतं की राष्ट्रवादीची पहिली टीम रवाना झाली म्हणून, सगळं तसच होतंय. आजही होर्डिंग लागले आहेत, त्यावर अजित पवार आणि शरद पवार यांचे एकत्र फोटो आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. पवारांचं राजकारण मी खूप वर्षांपासून बघतोय, ही सगळी मिलीभगत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज्यात रस्त्यांची ढासळलेली स्थितीवर बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, सगळ्या गोष्टी भोगून परत त्यांनाच मतदान केल्यानं ही शेफारलेली माणसं आहेत. काहीही केलं तरी लोक आम्हालाच मतदान करणार हा विश्वास त्यांना दिल्यानंतर तुम्हाला असेच रस्ते, प्रशासन मिळणार.

हे सांगणार की ७० हजार कोटींचा घोटाळा केला आणि आम्ही यांना जेलमध्ये टाकणार, नंतर तुम्ही त्यांच्यासोबत युती करणार. लोक परत यांनाच मतदान करणार. त्यामुळे जसं समाज असतो तसंच सरकार लोकांना मिळतं असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT