पुणे : शहरातील सदाशीव पेठेत एका कॉलेज विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दर्शन पवार या तरुणीच्या हत्येने महाराष्ट्र हादरलेला असतानाच शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात तरुणीवर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळाले. विरोधीपक्षातील नेत्यांकडून पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे असे म्हटले आहे.
"काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
"दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी." असा टोला राज ठाकरेंनी राज्य सरकारला लगावाला आहे.
यासोबतच ठाकरेंनी मनसैनिकांना देखील खास आवाहन केलं आहे. "माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा." असेही राज ठाकरे म्हणालेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.