Raj Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा रद्द होणार?

सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार?

सकाळ डिजिटल टीम

सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार?

औरंगाबादसह सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. मनसेच्या या सभेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे या कालावधीत औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या आदेशामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. (mns raj thackerya rally in aurangabad 1 may 2022)

दरम्यान, औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणार मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या होणारी सभा पोलिसांच्या आदेशामुळे रद्द करावी लागणार आहे. त्यामुळे आता यावर मनसे नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागेल आहे. शहरातील पोलिस यंत्रणाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या सभेला परवानगी नाकारली होती. तरीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती. रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, आता जमावबंदीच्या आदेशामुळे सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

तर एक बाजूला मनसेनं या सेभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाखांची गर्दी होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. असा आदेश लागू झाला असला तरी, मनसेकडून औरंगाबादमध्ये सभा होणारच, असा पवित्रा घेण्यात आला आहे. पोलिसांनी सभेसाठी सुचविलेला पर्यायी जागेचा प्रस्तावही मनसेने नाकारला होता. मात्र, आता जमावबंदीचा आदेश झुगारून मनसे औरंगाबादमध्ये सभा आयोजित करणार का, हे पाहावे लागणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. चिल्लर संघटनांना कितीही विरोध करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आपले मत व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक येतील, असा दावादेखील त्यांनी केला आहे. आता पोलिसांच्या या निर्णयानंतर मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT