Raj Thackeray ESakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: कुणाचा मोबाईल तर कुणाचे पैसे, राज ठाकरेंच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, तक्रारी दाखल

Akola News: राज ठाकरेंच्या सभेत चोरांनी वस्तू लांबिवल्या आहेत. अनेकांचे मोबाईल आणि पैशांची चोरी केली आहे. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Vrushal Karmarkar

अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत चोरट्यांनी हात धुवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या सभेत चोरट्यांनी कोणाचा खिसा कापला तर कोणाचा आयफोन चोरला. ही बाब महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात घडली आहे. यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच याबाबत पोलीस स्थानकामध्ये अनेक तक्रारी आल्या आहेत.

गेल्या महिन्यात 31 जुलै रोजी मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यावेळी मनसे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जयच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे अकोल्यात पोहोचले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी सभा घेतली होती. या सभेत ही घटना घडली आहे.

जय मालोकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मनसेच्या शुभ मंगल कार्यालयात सभा घेतली होती. या सभेतच चोरट्यांनी अनेकांना टार्गेट करून त्यांचे खिसे कापले. एवढेच नाही तर चोरट्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आयफोनही काढून घेतला. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि अधिकारी या चोरीसंदर्भात तक्रार देणार आहेत.

मनसेचे शहराध्यक्ष राकेश शर्मा यांचा खिसा कापला. त्यानंतर चोरट्यांनी 11 हजार रुपये चोरले. जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांचा खिसा कापला आहे. तसेच 7 हजार रुपये चोरले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मोबाईल चोरीला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT