Mohan Bhagwat On ayodhya ram mandir opening date RSS Dasara melava Nagpur 2023 marathi news  
महाराष्ट्र बातम्या

Dasara Nagpur2023 : २२ जानेवारीला प्रभू राम अयोध्येतील मंदिरात प्रवेश करतील; मोहन भागवतांनी दिली माहिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयातील दरवर्षी विजयदशमी सोहळा आयोजित केला जातो.

रोहित कणसे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयातील दरवर्षी विजयदशमी सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरएसएस कार्यकत्ये उपस्थित राहतात. या कार्यक्रमाला आज प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान या कार्यक्रमात बोतलाना संरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ जानेवारी रोजी प्रभू राम हे त्यांच्या अयोध्येतील राम मंदिरात प्रवेश करतील अशी माहिती दिली.

मोहन भागवत म्हणाले की, आपण सगळे पाहतोय की दरवर्षी भारतीयांचा गौरव जगभरात वाढत आहे. या वर्षीच्या विजयादशीला देखील आपण याची अनुभूती घेत आहोत. असे अनेक प्रसंग आपण अनुभवले जी२०ची परिषद यावर्षी भारतात झाली. दरवर्षी होते पण भारतात झाली त्याचे काही विशेष होतं. यावर्षी भारताच्या आतिथ्याचे सर्वत्र पहिल्यांदाच कौतुक झालं. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गौरव करण्यात आला. आपल्या मनातील प्रामाणिक सद्भावना आणि राजनैतिक कुशलात देखील सर्वांनी पाहिली, असे मोहन भागवत म्हणाले.

आर्थिक विषयांवर केंद्रीक परिषदेत पहिल्यांदाचं वसुधैव कुटुंबकम, महिलांचं नेतृत्वाबद्दल चर्चा करण्यात आली आणि ती मानव केंद्रीत चर्चा झाली. आपल्या नेतृत्वामुळ भारताचे एक विशेष स्थान असल्याचे पाहायला मिळालं.

इतकेच नाही तर आपले खेळाडूंनी देखील आशियाई खेळांमध्ये १०० पेक्षा अधिक पदके कमवले. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रोप्य आणि ४१ कास्य पदकं आपल्या खेळाडूंनी जिकंले.आपला देश सर्व क्षेत्रांमध्ये विकास करतो हे आपण पाहतोय. आर्थिक स्थितीत देखील आपण पाचव्या क्रमांकावर पोहचलो आहोत. डिजीटल तंत्रज्ञानांचा उपयोग आपण गरिबांच्या उत्थानासाठी केला. ही प्रगती आपण पाहिली आहे.स्टार्टअपची क्रांती झाल्याचे पाहयाल मिळालं. कृषी, स्पेस, डिफेंन्स या सर्व क्षेत्रात आपण प्रगती पाहिली आहे, असेही भागवत म्हणाले.

आपले राष्टीय आदर्श प्रभू राम यांचा आयोध्येत मंदीर तयार होत आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात प्रवेश करतील. हा प्रसंग देखील आपण पाहणार आहोत. सगळेजण येऊ शकणार नाहीत, पण त्या दिवशी आपल्या देशात आपापल्या ठिकाणी तसं वातावरण तयार करू शकतो असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT