lands sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सावकारांनी 100 एकर जमीन बळकावली; एका वर्षात सोलापुरातील 51 शेतकऱ्यांच्या तक्रारी; 15 वर्षांत कधीही ‘या’ अधिकाऱ्यांकडे करा अर्ज, परत मिळेल जमीन

सोलापूर जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांची १०० एकर जमीन सावकाराने फसवून बळकावल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे त्यासंदर्भातील दावे दाखल झाले आहेत. शहरात देखील जागा, वाहने, घर गहाण ठेवून ज्यादा व्याजदराने पैसे दिले जातात.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांची १०० एकर जमीन सावकाराने फसवून बळकावल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे त्यासंदर्भातील दावे दाखल झाले आहेत. शहरात देखील जागा, वाहने, घर गहाण ठेवून ज्यादा व्याजदराने पैसे दिले जातात. वेळेवर व्याज न दिल्यास किंवा मागेल त्यावेळी एकरकमी मुद्दल न दिल्यास त्या मालमत्तेवर सावकार कब्जा करतात, असे गुन्हे यापूर्वी शहर पोलिसांत दाखल झाले आहेत.

सततची नैसर्गिक आपत्ती अन्‌ शेतीपिकांचे नुकसान, नापिकी आणि बॅंकेचे डोक्यावरील कर्ज अशातच मुलीचा विवाह, मुलाचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, अशा संकटात शेतकरी सावकाराचा दरवाजा ठोठावतो. पण, समोरच्याची गरज पाहून सावकार तीन ते पाच टक्क्यांनी पैसे देतो आणि सहा महिने किंवा एक वर्षाला चक्रवाढ व्याज आकारतो.

सावकाराचे कर्ज आता शेतातील पिकातून कमी होईल आणि आपली जमीन पुन्हा परत मिळेल या आशेने रक्ताचे पाणी करून पिकाला जपतो. पण, त्याठिकाणी देखील त्याला नुकसानच सहन करावे लागते आणि सावकाराकडून पैशांसाठी तगादा लावला जातो. शेतकरी पैसे परत करू शकत नसल्याने ती जमीन सावकाराच्या घशात जाते. एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या काळात सोलापूर जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी न्यायासाठी खासगी सावकाराविरूद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे. जिल्हा उपनिबंधकांकडे मागील चार महिन्यांत सर्वाधिक दावे दाखल झाले आहेत.

सातबाऱ्यावर बोजा असताना खरेदीखत होतेच कसे?

सातबारा उताऱ्यावर बॅंकेच्या कर्जा बोजा असल्यास ती जमीन ना दुसऱ्याला खरेदी करता येते ना त्याची विक्री करता येते. बोजा असलेल्या जमीनीची खरेदी-विक्रीपूर्वी सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करून बॅंकेचे पत्र व्यवहारावेळी जोडणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक जमिनींची खरेदी-विक्री बॅंकेचा बोजा असतानाही होत असल्याची चर्चा आहे. पोकळ बोजा असल्याचे तोंडी सांगून असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे.

महिनानिहाय शेतकऱ्यांच्या तक्रारी

एप्रिल ते डिसेंबर २०२३

  • महिना तक्रारी

  • एप्रिल १

  • मे ४

  • जून ४

  • जुलै ७

  • ऑगस्ट २

  • सप्टेंबर २

  • ऑक्टोबर २

  • नोव्हेंबर ७

  • डिसेंबर ३

  • एकूण ३२

जानेवारी ते एप्रिल २०२४

  • महिना तक्रारी

  • जानेवारी ५

  • फेब्रुवारी ५

  • मार्च ६

  • एप्रिल ३

  • एकूण १९

गूणमुल्यांच्या आधारे सावकारी दाव्यांचा निकाल

खासगी सावकाराने फसवणूक करून जमीन बळकावली असल्यास संबंधित शेतकऱ्यास साध्या कागदावर थेट आमच्या कार्यालयाकडे तक्रार करता येईल. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रानुसार सत्यता पडताळली जाते. त्यानंतर दावा दाखल होऊन दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली जाते. पुराव्यांच्या आधारे अन्यायग्रस्त शेतकऱ्याला त्याची जमीन पुन्हा दिली जाते. सावकाराच्या नावावरील खरेदीखत रद्दचे अधिकार आम्हाला आहेत.

- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

१५ वर्षांच्या आत करता येईल तक्रार

एखाद्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने फसवणूक बळकावली असेल तर त्या शेतकऱ्याला ती जमीन थेट परत मिळू शकते. पण, त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने सावकाराच्या नावे जमिनीचे खरेदीखत झाल्यापासून पुढे १५ वर्षांच्या आत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दावा दाखल करणे किंवा तक्रारी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर सखोल चौकशी होऊन गुणमूल्याच्या आधारावर अंतिम निकाल होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT