Monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : वरुणराजाने फिरवली पाठ, जूनमध्ये पाऊस कमी

मॉन्सूनची वाटचाल थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनची वाटचाल थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.

मात्र उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे.

जूनमध्ये देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (९२-१०८ टक्के) अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता. जूनमध्ये देशात सरासरी १६६.७ मिलिमीटर पाऊस पडतो. सुधारित अंदाजानुसार देशात ९२ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात दक्षिण द्वीपकल्प तसेच महाराष्ट्रासह लगतच्या मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक, तर वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जूनमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. जून महिन्यात १८ जून पर्यंत देशात सरासरी ८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ६४.५ टक्के म्हणजेच उणे २० टक्के पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यातही वायव्य भारतात (उणे ७० टक्के) मध्य भारतात (उणे ३१ टक्के) तर पूर्वोत्तर राज्यात (उणे १५ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यातही उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात १०५.८ मिलिमीटर (अधिक ३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. यात मध्य महाराष्ट्र (अधिक ३१ टक्के) आणि मराठवाड्यात (अधिक ६३ टक्के) पावसाची तर कोकणात (उणे २५ टक्के) आणि विदर्भात (उणे ३० टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

जुलैमध्ये ‘ला-निना’ची शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आले आहे. या भागात जुलै महिन्यात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यांत ‘ला-निना’ तयार होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. हिवाळ्यातही ही स्थिती कायम राहणार असून, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात ‘ला-निना’ची शक्यता सर्वाधिक ८५ टक्के असल्याचे नोवा या अमेरिकन हवामान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

नैॡत्य मोसमी वारे यंदा १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाले. रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने सहा दिवस आधीच मोसमी वारे पूर्वोत्तर राज्यांत दाखल झाले. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) दाखल झालेल्या मॉन्सूनने अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत १२ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात मजल मारली. पूर्व भारतात ३१ मेनंतर आणि महाराष्ट्रात १२ जूननंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली असून तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT