Monsoon Session 2023 Bhaskar Jadhav 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session 2023 : पहिल्याच दिवशी कळलं, सरकार किती मुजोरपणे वागू शकतं; भास्कर जाधवांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना बेदखल करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर सत्ताधारी हे विरोधकच गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं म्हटलं आहे. एकूणच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहिला मिळाला. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

भास्कर जाधव म्हणाले की, सभागृहात आज विशेष कामकाज नव्हतं. त्यातच सरकारकडे पाशवी बहुमत आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे सरकारकडून सौदार्हाची भूमिका घेतली जाईल आणि विरोधी पक्षांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांना आपली भूमिका मांडण्याची प्रयत्न करत होते. मात्र सरकारने त्याची सुताराम दखल घेतली नाही. तसेच नम्रता आणि लोकशाही पद्धतीने सरकारकडून विरोधकांचं म्हणण ऐकूण घेईल अशी शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत मला काही माहिती नाही. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. त्यांच्या विरोधात प्रविण दरेकर यांनी अविश्वासाचा ठराव आणला होता. तो ठराव चर्चेत आला पाहिजे आणि मतदान झाले पाहिजे, असा आग्रक विधान परिषद सदस्यांचा असेल तर त्यात चुकीच काहीही नाही.

निलम गोऱ्हे शिंदे गटात गेल्यानंतर प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव मागे घेतला. त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला असेल तर ते योग्यच आहे, अशी भूमिका जाधव यांनी घेतली.

दरम्यान थोरातांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रस्ताव मांडू द्यायचा नाही, हे स्पष्ट झाल्याचं जाधव यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT