Monsoon Session of Assembly 17 July 2023 congress balasaheb Thorat on farmers issue opposition walked out of assembly  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : 'यांना मंत्रिमंडळाचा विस्तार-खातेवाटप करायचं, दिल्लीला जायचं…'; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग

रोहित कणसे

2023 Maharashtra Monsoon Session : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार, १७ जुलै) सुरू झाले असून, विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात पावसाची गंभीर स्थिती आणि दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यानंतर थोड्याच वेळात विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज १७ जुलै रोजी राज्यात पावसाच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. मान्सून उशीरा सुरू झााल आणि राज्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रात पाऊस नाही, पेरण्या २० टक्केच झाल्या आहेत. पेरण्या झाल्या नाहीत, दुसरे मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यासाठीची मदत कांद्यासाठी जाहीर केलेलं अनुदान देखील अद्याप मिळालेलं नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नगर जिल्ह्यात पारनेर येथे गेले होते. तेथे आठ दिवसात मदत पाठवतो असा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

सरकारी टोळ्या हप्ते वसूल करत आहेत..

यामध्ये बोगस बियाणे आणि खते मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आले आहेत. काही टोळ्या सरकारी टोळ्या असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम राज्यात चालला आहे. सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या परिस्थीतीकडे लक्ष नाहीये.

यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, खातेवाटप करायचं, दिल्लीला जायचं-यायचं. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केला. तसेच त्यांनी आजच या मुद्द्यावर चर्चा झाली पाहीजे. ही गंभीर, तातडीची परिस्थिती आहे. पुढचं कामकाज थांबवून या प्रश्नावर चर्चेला सुरूवात करावी अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन राजकीय घराण्यात पुन्हा अस्तित्वाची लढाई; शंभूराज देसाई-पाटणकरांमध्ये अटीतटीची लढत, देसाई साधणार हॅट्‌ट्रिक?

Ola Electric: कुणाल कामरा आणि ओलाचे सीईओ यांच्यातील वाद वाढला; 'ते' ट्वीट पडलं महागात, कंपनीचे शेअर्स कोसळले

Latest Maharashtra News Updates Live : शिवसेना UBT - काँग्रेस वादावर शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी?

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: इच्छुकांना लागली पक्षीय जागा वाटाघाटीची प्रतिक्षा; चारही मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी

Aadhaar Card Tips : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला हे विसरलात? एका क्लिकवर करा नंबर लिंकचं काम

SCROLL FOR NEXT