sanjay Shirsat 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : मणिपूरची घटना निंदणीय, पण एका निषेध ठरावाने झालं असतं; विरोधकांच्या सभात्यागावर शिरसाट यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. शुक्रवारी इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून सभागृहात माहिती देण्यात आली होती. त्याचवेळी मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या घटनांवरून राजकारण तापले आहे. महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात प्रस्ताव मांडला पाहिजे, असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, की विरोधक कशावरूनही सभात्याग करतात. मणिपूरमधील घटना निंदणीय आहेच. त्यासाठी या सभागृहाचा वेळ वाया घालवू नये. एक निषेधाचा ठराव घेतला असता तरी झालं असतं. परंतु यासाठी सभात्याग केला. कामकाज थांबवलं. अशा पद्धतीने सभात्याग केल्याने जनतेच्या पैशांची उधळपट्टी होते. तरी आम्ही त्याची चिंता करत नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मणिपूरमध्ये महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात प्रस्ताव मांडला पाहिजे असं म्हणत यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड सभागृहात आक्रमक झाल्या होत्या. त्यावर "मी नाकारले नाही, आपल्याकडे नियम आहेत. तुम्ही प्रस्ताव मांडा मग बघू... तुम्ही प्रस्ताव मांडणार नाही आणि चर्चा मागणार असे होणार नाही" असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

दरम्यान महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अत्याचारी सरकारचा धिक्कार असो, मौनी बाबा सरकारचा धिक्कार असो" असं म्हणत, महिला आमदार वेलमध्ये घोषणा देत होत्या. त्यानंतर काही विरोधकांनी सभात्याग केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT