Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला; खरिपाच्या पेरणीत व्यत्यय

सकाळ डिजिटल टीम

पूर्व भागात पावसाने पूर्ण उघडीप दिलेली पाहावयास मिळाली. गेली काही दिवस वारंवार पावसामुळे खरिपाच्या पेरणीत व्यत्यय येत होता.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा (Rain) जोर मंदावला आहे. पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यासाठी आज दिवसभर शेतात काम सुरू होते.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरने (Mahabaleshwar) आज एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १४, नवजाला ३८ आणि महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयाची पाणीपातळी २०४३.०७ फूट झाली.

तर, एकूण पाणीसाठा १५.४४ टीएमसी झाला आहे. जलाशयात प्रतिसेकंद आठ हजार ६२० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, काल पश्चिम भागात रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. पूर्व भागात पावसाने पूर्ण उघडीप दिलेली पाहावयास मिळाली. गेली काही दिवस वारंवार पावसामुळे खरिपाच्या पेरणीत व्यत्यय येत होता.

उघडीप मिळाली, की शेतकरी पेरणीसाठी जात होता. मात्र, पाऊस आला, की घातमोड होऊन पेरणीची कामे थांबवून घरी परतावे लागत होते. आज सकाळी दहा वाजेपर्यंत रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, दहा वाजल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने दिवसभर शेतकरी पेरणीची कामे उरकण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

SCROLL FOR NEXT