मूर्तिजापूर: शनिवार (ता.२४) पासून मॉन्सून सक्रिय होऊन विदर्भात सर्वदूर नदी, नाले ओढे भरून जातील एवढा पाऊस ता.३ जुलैपर्यंत पडणार असल्याचे भाकीत हवान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले असून, लाबलृल्या पावसामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आण्णासाहेब उपाख्य वा.रा. कोरपे जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
येत्या ता. २४ जूनपासून मॉन्सून सक्रिय होऊन पूर्व, पश्चिम विदर्भात सर्वदूर नदी, नाले ओढे भरून जातील एवढा पाऊस ता.३ जुलैपर्यंत पडणार आहे व ता.२६ ऑक्टोबरला थंडीची लाट येण्याचे भाकीत त्यांनी केले.
शिवाय अलनिनो आणि हेलनिनो या वादळांमुळे काय परिणाम होतात हे त्यांनी यावेळी समजाऊन सांगितले.
वाढती कारखानदारी, शहरीकरण, महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरीकरणामुळे झालेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. परिणामतः मॉन्सून २२ दिवस पुढे ढकलत गेला आहे.
तसेच कमी वेळात जास्त पाऊस पडण्यामुळे पूर येणे, शेती खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावर पर्याय सूचवितांना वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ता.२८, २९, ३० जून या तारखांना मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अतिवृष्टी होण्याचेही भाकीत त्यांनी केले. हवामान खाते उपग्रहांवरून अंदाज व्यक्त करतात.
त्यामुळे कधीकधी अंदाज चुकतात. पर्यायी व्यवस्था नसेलच, तर पारंपारिक पद्धतीने हवामानाचा अंदाज कसा करावा ? याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ता. २ ते ७ डिसेंबर अवकाळी पाऊस येणारच.
ही आहेत चांगल्या मॉन्सूनची लक्षणे
ता.१५ ते ३० मे या कालावधीत अवकाळी पाऊस येणे हे चांगल्या मॉन्सूनचे लक्षण आहे. मॉन्सून काळात विमानाचा आवाज येणे, एका गावातील लाऊडस्पीकरचा आवाज दुसऱ्या गावात ऐकू येणे, चिमण्यांनी धुळीत आंघोळ करणे.
जांभुळ लवकर पीकने, अस्थमाच्या रुग्णांना दम्याचा त्रास होणे, दिव्यांवर कीटक पतंगे खेळणे, चिंचा जास्त येणे, कडुलिंबाच्या झाडाला जास्त लिंबोळ्या येणे ही सर्व चांगल्या मॉन्सूनची लक्षणे असल्याचे ते म्हणाले.
विजांचा पाऊस पिकांसाठी खूप पोषक
उलटपक्षी गावरान आंबा जास्त पीकणे, बिब्याच्या झाडाला बिबे जास्त लागणे, ही दुष्काळाची लक्षणे असल्याचे ते म्हणाले. पायाळु लोक हातात किंवा पायात तांब्याचे कडे वगैरे घालतात त्यामुळे त्यांच्यावर विज जास्त पडते.
नदी, नाले, तलाव, धरणे, आंब्याचे झाड, लिंबाचे झाड, उंच खांब, झाडे इत्यादी ठिकाणी खूप विजा पडतात, असे सांगून विजांचा पाऊस पिकांसाठी खूप पोषक असल्याचे ते म्हणाले. दरवर्षी २२ फेब्रुवारी ते २० मार्च गारपीट होणारच असा दावाही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.