moog esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मुगाचे पीक जोमात; बाजार समितीत आवक वाढली

बाबासाहेब कदम

बाणगाव बुद्रुक : या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच, मूग पिकास पोषक वातावरण मिळाल्याने नगदी पीक अशी ओळख असलेल्या मुगाचे चांगले उत्पन्न होणार आहे. बाजार समितीत मूग विक्रीसाठी आणणाऱ्‍या शेतकऱ्‍यांची गर्दी वाढत आहे. तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यल्प पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न तीन वर्षांपासून निघालेले नाही. नगदी पीक असलेल्या मुगाला दोन वर्षांत एकरी क्विंटलपर्यंतच उत्पन्न झाले. त्या वेळी बाजारात मुगाला भरमसाट भाव मिळाला होता. मात्र, मुगाची आवकच नसल्याने शेतकऱ्‍यांचा फायदा झाला नाही.


शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे राज्यात घेण्यात येणाऱ्या कडधान्यामध्ये मुगाचे दुसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्र आहे. विविध पीकपद्धतीत मुगाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत टिकून तो सुधारण्याससुद्धा मदत होते. मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळे आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्याने जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचविता येते. या वर्षी राज्यात दोन लाख ७१ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. केंद्र सरकारने मुगासाठी प्रतिक्विंटल सात हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात सध्या मुगाला सरासरी सात हजार ६०० रुपये दर मिळतो. नाशिक जिल्ह्यात शेतकरी पावसाळी (लाल कांदा) कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. कांदा लागवडीसाठी ठेवलेल्या क्षेत्रात खत म्हणून मूग पीक केले जाते. मूग पीक आल्यावर शेंगा न तोडता पीक नांगरून खत म्हणून जमीन दडपली जाते. गेल्या वर्षी मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात होऊनही उत्पादन घटले. तसेच पावसाळी कांदा पिकास समाधानकारक भाव न मिळाल्याने या वर्षी मुगाची जोपासना करून उत्पादन काढण्यासाठी बळीराजा मेहनत घेत आहे.


मुगाचे शिफारस केलेले वाण
जळगाव ७८१
टी. ए. पी. ७
कोपरगाव
एस. ०८
पुसा, वैशाखी
फुले मूग २

नांदगाव तालुक्यातील आकडेवारी
२०२०- २१ : ५७६३ हेक्टरवर पेरणी
उत्पादन : दहा हजार क्विंटल

२०२२- २३ : ३८८० हेक्टरवर पेरणी
८ सप्टेंबर २०२२ पर्यंत : ६२३५ क्विंटल विक्री

''नांदगाव बाजार समितीत या वर्षी मुगाची आवक चांगली आहे. येथे येवला, चाळीसगाव, वैजापूर तालुक्यांतील शेतकरी मूग विक्रीस आणतात. ८ सप्टेंबरअखेर सहा हजार २३५ क्विंटल विक्री झाली आहे. अजूनही मुगाची आवक सुरूच आहे.'' - अमोल खैरनार, सचिव, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती



''गेल्या हंगामात मुगाच्या पेरणीत वाढ झाली. पण उत्पादन कमी झाले. कारण पावसाळी (लाल) कांदा लागवडीसाठी ठेवलेल्या जागेवर मुगाची पेरणी केली. पिकाची वाढ झाल्याने शेंगा न तोडता त्याचा खत म्हणून वापर केला. या वर्षी पीक उत्पादन म्हणून जोपासले आहे. यामुळे उत्पादन वाढणार आहे.'' - जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव

''या दिवसात एकमेव मूग पीक विकून आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळते. दुसऱ्या कोणत्याच पिकाचे उत्पादन या वेळी नसते. मुगामुळे आमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या हातभार लागला आहे.'' - जिभाऊ सोनवणे, युवा शेतकरी, बाणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT