मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंड आमदारांमुळे खरी शिवसेना कोणती असा प्रश्न निर्माण होत आहे. एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपणच खरे शिवसैनिक असल्याचे सांगत आहे. यामुळे सामान्य शिवसैनिक कोणासोबत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वेक्षणातून सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असले तरी शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या शिवसैनिकांचा आकडा शिवसेना पक्षाला चिंतेत टाकणारा असल्याचे दिसून येत आहे. ( Sakal Survey The number of scattered Shiv Sainiks raises the partys concern)
सकाळ वृत्तपत्र समूह व साम टीव्हीतर्फे शिवसेनेच्या मतदार संघात शिवसैनिकांना प्रश्न विचारून महासर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा भाजप यांच्या मतदार संघांचा समावेश नव्हता. तुमची साथ कोणाला असे विचारले असता ८२.४ टक्के शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३.७ टक्के शिवसैनिक असल्याचे दिसले. १३.६ टक्के मत कमी वाटत असली तरी हा आकडा चिंता वाढवणारा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
आजवर शिवसैनिकांना फक्त हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच मान्य होती. त्यांच्या घराण्याचेच नेतृत्व मान्य होते. मात्र, १३.६ टक्के शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. हा आकडा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शिवसेना हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष असल्याचे म्हटले जात होते. यामुळेच हा आकडा शिवसेना पक्षाची चिंता वाढवणारा आहे, असे सकाळ समूहाचे संपादक श्रीराम पवार चर्चेत म्हणाले.
बंड पुकारलेल्या आमदारांबद्दल गैरसमज पसरविले जात आहे. तसे वातावरण तयार केले जात आहे. आमच्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेकडून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सर्वेत सहभागी झालेल्या शिवसैनिकांना चुकीचे म्हणता येणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.
तुमहीची ही मोहीम आहे तर सुरत किंवा गुवाहाटीत जाण्याची गरज काय होती. भाजप शासीत राज्यात का गेला, असा प्रश्न मनीषा कारंडे यांनी चर्चेत विचारला. तेव्हा आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना त्रास देणार नाही. किंवा मोठे पद मिळावे म्हणून असे केले नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दूर सारले तरच शिवसेना मोठी होईल. मी माणसं जोडणारा माणूस आहे तोडणारा नाही. वैयक्तिक पातळीवर आल्यावर दुख होते. आम्ही कोणाच्याही दबावात नाही. फक्त कार्यपद्धतीवर आक्षेप आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.