नागपूर ः स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी धुमाकूळ घालणाऱ्या काळात एका गर्भात सर्वांचा गर्व वाढवणारा गर्भ कसा वाढला आणि त्या गर्भाचा महावृक्ष आणि त्याच्या जळामुळा कशा पसरल्या. सर्वांची धक-धक वाढवून धगधगत्या ज्वाळांप्रमाणे रक्तदाब सुद्धा वाढणार नाही, असे उष्ण निर्णय घेण्याची कुवत... सर्वांच्या डोक्यावरचे केस केव्हाचेच गायब करून बुद्धीला पण बुद्धू बनवण्याची विद्या जाणणारा पुरुष, एक महापुरुष म्हणून परिचित होण्याचा काळ आजच्या पिढीच्या वाट्याला आणणारा एकमेव महान मानव सटीकपणे म्हणण्याची हिंमत करायला अगदी सहज लावतो. जाणता आहे, हे जाणकार म्हणतीलच ! पण जाणीवपूर्वक काहीतरी अद्भूत करण्याची रुबाबी कसरत करणारा पुरुष इलेक्ट्रिक ‘पॉवर’पेक्षा भयंकर शॉक देणारा पॉवर म्हणजे शरद पवार ! powerat80
१९४० नंतर देश जले जावच्या तयारीतून १९४२ ला पेटला होता. या स्वातंत्र्याच्या वणव्यातून धगधगणाऱ्या आंदोलनाचा प्रत्येक नायक यावेळी भूमिका घेत असताना निवांत मातेच्या गर्भात विश्राम करून १२-१२-१९४० मध्ये प्रसूत झालेला शरद आजच्या युगाचा ‘राजनायक’ म्हणून सर्वांच्या परिचयाचा लोकनेता, जाणता राजा, साहेब, राजनीतिज्ञ आणि अखंडपणाने पुस्तकाच्या प्रत्येक पानाचा बुद्धीच्या कसोटीतून विवेकाच्या दृष्टीने धोरणाला आकार देणारा शरद गोविंदराव पवार. आठ दशकांनंतरही भर पावसात राज्यभरातल्या तरुणांच्या काळजाला लाजवून जेव्हा ऊभा होतो. तेव्हा नभातूनसुद्धा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अभिषेक पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आसुसतो. अशा वर्णनाने प्रत्येक कार्यकर्ता ओथंबून जावा येवढा विश्वास देणारा ऐंशीच्या वयोमानातील वृद्धत्वाचं शरीर धारण केलेला धगधगता तरुण उभा राहतो. एका षटयंत्री पक्षाच्या विरोधात तेव्हा जाणून घ्यावा वाटतो. पवारांचा पॉवर आणि उभे होतात सर्वांचे सन्मानाने हात मुजरा आणि सलाम करण्यासाठी...
साहेबांमध्ये गुणाचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करण्याचं सामर्थ्य आहे. वर्तमानकाळाचा पूर्ण अंदाज घेऊन भविष्याचे भाकीत उद्घोषीत करण्याचा विश्वास असणारा जाणता पुरुष म्हणून पवारांचा परिचय सर्वदूर आहे. तारुण्याचा स्वभाव, उत्साह, हिंमत, स्वप्नांची रचना आणि वास्तवाला टिकून ठेवण्याच्या सामर्थ्याप्रमाणे असतो. क्षमतांची ओळख, त्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याचं पालकत्व ज्यांच्या अंगी असते, ते शासन व्यवस्था निर्माण करतात. याची प्रचिती आर. आर. पाटलांपासून तर अनेक तळागाळातील नेत्यांना त्याच्याप्रमाणे चमक देणाऱ्या पवारांनाच पॉवर आहे.
धाडस हे क्षमतेनुसार जरी येत असलं तरी ते धाडस करण्यासाठीची चालना, प्रेरणा देणारा मार्गदर्शक किंवा गुरू असल्याशिवाय कुणावरच किमया होत नाही याचा अनुभव आजही बारामतीच्या वलयाशिवाय सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशिवाय विरोधी, मित्र किंवा समर्थक नेते सुद्धा उगाच बोलत नाहीत. पुस्तकांचा व्यासंगी आणि प्रसंगी युक्ती, निर्णय आणि बचाव करणारे मार्गदर्शन उगाच देत नाही. मग तो विषय कुठलाही असो. त्याचा लाभ अनेक पिढ्यांना, त्यांच्या समाजकुळासोबत मानवी जमातीसाठी लाभदायक होईल, अशा धोरणांची चुणूक सुचवून विरोधकांना चुकवण्याचा चाणक्यपणा ठेवणारा ऐंशीचा एक वृद्धत्व पांघरून तारुण्याची उब देणारा स्वयंभूत पॉवर म्हणजेच शरद पवार.
राजकारण म्हणजे विशेष करणे. ही व्याख्या ज्यांनी समजून घेतली असेल, त्यांनी राजकारणात सहभाग घेऊन जनतेच्या जीवनातील समस्या सोडवण्याचे कार्य करावे. हीच राजकीय नेत्याची कर्तबगारी दाखवण्याची संधी देणारा राजनायक म्हणून बाळासाहेब ठाकरेंसारखे विरोधकसुद्धा स्वर्गातून त्यांच्या वाढदिवसाला स्तुतिसुमनांचा वर्षाव करत असतात, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कुणापासूनही लपवू शकत नाही. येवढा विश्वास देणारा अष्टदशकी व्यक्ती जाणत्या पिढीसाठी साक्षात कर्तव्यावर असताना दिसतो. त्या अप्रूप शक्तीला, ऊर्जेला उत्सर्जित करणारा पॉवर साहेबांशिवाय दुसरा असूच शकत नाही.
दुष्काळ हा निसर्गाचा लपंडाव किंवा महापूर अथवा इतरही नैसर्गिक घडामोडीचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांच्या राजवटीत अनुभवायला आला असेल, त्यावेळी सर्व शासकीय आस्थापनांपासूनचे व्यवस्थापन तर सर्वच कर्मचारी, अधिकारी, पुढारी, नेते, कार्यकर्ते आपापल्या क्षमतेनुसार ऊर्जित करून सर्वांकडून विश्वास अर्जीत करणारा लोकनेता फक्त साहेबच असू शकतात. असा आत्मविश्वास आजही ‘राजगुरू’ यशवंतराव चव्हाण कुठल्याही जन्मात, कोणत्याही रुपात येतील तरी शरदचंद्र पवार साहेबांसाठी बाळगतील. येवढा सर्व परिणाम आजची पिढी शरदचंद्र पवार यांच्या वास्तविक जीवनातून अनुभवताना दिसतो. आपलं मत व्यक्त करण्याची संधी प्रत्येक तरुण घेण्यासाठी आतुरलेला आहे. कारण नव्या पिढीने राजकारणात प्रत्यक्ष येताना साहेबांचा हस्तस्पर्श, निवडलेल्या ध्येयावर शेरा आणि नुसतं एखादं वाक्य समजून घेण्यासाठी तयार असल्याचा परिचय २०१९ च्या निवडणुकीत करून घेतला.
बुडते हे जननी देखते डोळा... अशी तुकोबा वृत्ती संवेदनशील हृदयात संचारते, हे खरे जरी असले तरी बुडते हे सरकार, न पेलते पक्ष फार, अशा स्थितीची बांधणी अपंगाला आधार देणाऱ्याची प्रसंगावधानता बाळगण्याची दृष्टी सबळाला दुर्बल बनवण्याची माधव वृत्ती फक्त पवारांच्याच मेंदूत पिकते. असा आरोप प्रत्यारोपाचा वर्षाव सहज ‘अभी तो मै जवान हूं’, अशा विनोदी शैलीत डोक्यावरून हात फिरवणारे, राज किमयागार म्हणजे शरद पवारच आहेत, हे अशा वैदर्भीय शैलीतील उत्तरसुद्धा नागपुरातील लोकांनी उद्घारले. अशी समाजमाध्यमांची किमया सर्वांना तोंडात बोटे टाकणारी आहे.
कोरोनाचा काळ, ताट, थाळी पिटणाऱ्यांपासून तर मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांसाठी सुखावह असला तरी अतिवृष्टीत बांधांवर आणि छोट्या किरकोळ धंद्यांवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या जीवनावर सदैव लक्ष वेधून घेण्याचा ध्यास पवार साहेबांचा आहे. कृषी मंत्री असताना कुण्याही आंदोलकांचा आक्रोश होऊ दिला नाही. परंतु आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत किसान आंदोलनाची आग पेटताना पवार साहेबांशिवाय कुणीच फुंकर घालू शकत नाही. याची वाट पाहणारे आजही ८०च्या वयोमानातील शरदचंद्रांच्या पॉवरची अपेक्षाच करीत असल्याचं आश्चर्यही वाटतं. कारण शरदचंद्र पवार हेच भारतीय राजकारणाच्या क्षेत्राशी आणि पिढी दर पिढीपर्यंत राजकारण पोहोचवण्याची हमी देणारा ‘राजनायक’ अवघे ऐंशी वयोमान, अन् राजकारणात घालते थैमान...!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.