Farmers of Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Farmers of Maharashtra: शेतकऱ्यांच्या 4 महिन्यातील मृत्यूंच्या संख्येने महाराष्ट्र हादरला! विदर्भात तर भयानक वास्तव, सरकारचं दुर्लक्ष?

Maharashtra Farmers update: राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Sandip Kapde

Maharashtra Farmers:

महाराष्ट्र अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुपारी दोन वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. अधिवेशनापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने होते. दरम्यान, राज्यात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशन चांगलेच गाजणार आहे. विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर गंभीर आहेत.

जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५, आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत. या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

तर दुसरीकडे ८३८ पैकी १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली आहेत. त्यात आतापर्यंत फक्त १०४ शेतकऱ्यांनाच १ लाख आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT