onion esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड! यावर्षी जिल्ह्यात उत्पादित होणार साडेपाच लाख मे.टन कांदा; सध्या कांद्याला 3 ते 5 हजाराचा दर

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील लघू-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढली आहे. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांमध्ये यंदा कांदा लागवड सर्वाधिक झाला आहे. हेक्टरी १४ मे.टन कांदा उत्पादन होते. यंदा सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ६० हजार मे.टन कांदा उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील कांदा साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर आणि सर्वाधिक कांदा डिसेंबर व जानेवारीत बाजारात येतो.

१५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात सर्वाधिक कांदा लागवड झाला आहे. तीन महिन्यानंतर तो कांदा बाजारात विक्रीसाठी येईल. गतवर्षी जिल्ह्यातील कांदा बाजारात आल्यानंतर मार्चमध्ये निर्यातबंदी झाली आणि कांद्याचे दर गडगडले. निर्यातबंदीपूर्वी कांद्याला सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. पण, भाव कमी झाल्यावर हजारो शेतकऱ्यांनी बंगळुर बाजारात कांदा विकला. यंदा निर्यातबंदी होणार नाही या आशेने जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त कांदा लागवड झाला आहे.

सध्या कांद्याला ३ ते ५ हजाराचा दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल तीन ते पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे. दररोज बाजार समितीत ८० ते ११० गाड्या कांद्याची आवक होत आहे. कर्नाटकातून आता पांढरा कांदा विक्रीसाठी येत असून ऑक्टोबरमध्ये नियमित कांदा विक्रीसाठी येईल. सोलापूर जिल्ह्यातील कांदा देखील ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी येतो. यावर्षी कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: अचानक आलेल्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपीट

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT