Parth Pawar News: राजकारणातील दादा म्हणजे अजित पवार. भलभल्यांची राजकीय दादागिरी या दादांनी उतरवली. दादांची समयसुचकता आणि निर्णय घेण्याची क्षमता ही सर्वांना परिचीत आहे. दादांचे राजकीय खेळ कुणालाचं कळत नाही. मात्र ज्यांचे दादा ऐकतात त्या म्हणजे सनेत्रा अजित पवार.
सुनेत्रा पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. राजकीय-सामाजिक प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांना पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
आदित्य ठाकरे यांच्यापासून सत्यजित तांबे पर्यंत तर अभिजित वंजारी पासून सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत ही सर्व नेत्यांनी मुलं सक्रिय राजकारणात आली. पार्थ पवार यांनी देखील मावळ मधून लोकसभेसाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.
यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, माझी मुलं मोठी झालेली आहेत. आमच्या घरात प्रत्येकाला त्यांचे निर्णय घ्यायला पुर्ण स्वतंत्र आहे. त्यांना जे वाटेल तो निर्णय ते घेतील. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा राहील.
पार्थ पवार यांनी जानेवारी महिन्यात शिंदे गटाचे राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली होती. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क यांना उधाण आले होते. तसेच पार्थ पवार आणि देसाई यांच्या भेटीवर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी सूचक विधान केलं होतं. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतली असावी, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रोही त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही रोहित पवार झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल असं पडळकर म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.