महाराष्ट्राच्या राजकारणात टॉपवर असलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेले. राजकारणातील त्यांच्या अनोखी शैलीमुळे त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात.
तुम्हाला माहिती आहे का शरद पवारांना राजकारणात येण्याचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला. आज मातृदिन विशेष मालिकेत आज आपण शरद पवारांच्या आईविषयी जाणून घेणार आहोत. ( mothers day special ncp leader sharad pawar mother shardabai pawar political background )
शरद पवारांच्या आई त्यांच्यासारख्याच धाडसी होत्या. त्यांंनी त्यांंच्या आयुष्यात खूप संघर्ष केला. कठिण प्रसंगातून मार्ग काढत त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांच्याच संस्काराचे आणि शिकवणीचे बीज शरद पवार आज संपुर्ण महाराष्ट्राला दिशा देताहेत.
शारदाबाईंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे या गावात 1912 ला झाला. बाईंच्या जन्मदरम्यान राजर्षी शाहूंनी कोल्हापूरमधे महात्मा फुल्यांच्या विचारसरणीने प्रेरित असलेल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामुळे फुले, शाहू यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता
लहानपणीच वडिलांची पितृछायेला पारखे व्हावे लागले. वडील वारल्यानंतर दोन बहिणी, एक भाऊ व आई असे कुटूंब होते. आबांशी त्यांचे लग्न झाल्यानंतर आबा बाईना एकंदरीत तेरा मुले झाली. नऊ मुले व चार मुली. त्यातील दोन मुले लहान असतानाच वारली. या दोघांचेही नाव यशवंत ठेवले होते. मुलांना उपदेश करताना त्या अनेकवेळा म्हणत, किडामुंगीसारखे जगू नका, जीवनात उच्च ध्येय ठेवा. स्वत:च्या उत्कर्षाबरोबरच समाजाच्या उत्कर्षाचेही ध्येय समोर ठेवा.
मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी बाई स्वतः कधीही स्टॅंडपर्यंत पोहोचवायला गेल्या नाहीत. सर्व मुलांना उडण्यासाठी पंखात बळ दिले, सर्वाना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रगतीचीही एक विशाल दृष्टी दिली. एवढेच नव्हे तर माधवराना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा होती तर त्यासाठी जमीन विकून पैसे उभे केले. पवार कुटुंबाच्या यशामध्ये माधवरावांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांचा मोठा वाटा होता. लंडनमधील शिक्षणाचा आपला खर्च भागविता यावा म्हणून माधवराव मैदानाच्या बाहेर उशा भाड्याने देऊन पैसे मिळवीत.
वसंतराव हे बाईंचे सर्वात थोरले सुपुत्र. त्यांनी बडोदा व पुणे येथून शिक्षण घेतले. पुढे ते शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत गेले. पुणे जिल्ह्यातील एक निष्णात कायदेपंडित म्हणून त्यांचा नावलौकिक होता, पण अवघे ३५ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. बाईंच्या सर्व मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले पण डॉक्टर कोणीच झाले नाही, बाई आबांना एक तरी मुलगा डॉक्टर व्हावा असे वाटत होते.
अकरा मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न, व्यवसाय उभारणी या सर्वात बाई आबा तसूभरही कमी पडले नाहीत. बाईनीं मुलगा मुलगी भेद न करता सर्वाना शिकविले जीवनाच्या पाठशाळेतील स्नातकांच्या ज्ञानाला सेवेची जोड असावी, असा संस्कार बाईंनी आपल्या मुलांवर रुजविला.
या संस्कारातून समाजप्रबोधनाचे बीज रुजले जाणे, हे परिस्थितीशी सुसंगत तर आहेच पण तितकेच गरजेचेही आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्याची यशाकडे होणारी वाटचाल, या सर्व प्रक्रियेमागची प्रेरणा, संस्कार , विचार, जडणघडण, शिकवन यांचा प्रगल्भतेने विचार होणे नेहमीच गरजेचे असते.
यश हे फक्त पैशाअधारे वा प्रयत्नाधारे मिळत नसून मूळ विचारांमध्ये दूरगामी नियोजन असणे व त्याप्रमाणे नेमकेपणाने पण कठोर अंमलबजावणीची तयारी ठेवणे हे हि गरजेचे आहे. मुलांच्या यश-अपयशात तटस्थतेने सहभागी होऊन त्यांना सातत्याने पाठिंबा देणे, हि साधी गोष्ट नाही. अशा आईचे मन शब्दात पकडणे हे फार कठीण काम आहे!
प्रपंच, मुलेबाळे, त्यांचे शिक्षण,संगोपन, लग्नकार्य, अडीअडचणी,सुखदुःख तर घरोघरी आहे. ही वाट मळवट जाणारे अनेकजण आहेत. बाईंचा स्वभाव मळलेल्या वाटेने जाण्याचा नव्हता.जून 1938 मधील निवडणुकीत बाईंना काँग्रेस पक्षाने लोकल बोर्डच्या निवडणुकीत उभे केले. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून एक जागा महिला राखीव असायची व संपूर्ण पुणे जिह्वा मतदारसंघ असायचा. या जागेवर बाईंची बिनविरोध निवड झाली.
त्यावेळच्या निवडणूक पद्धतीप्रमाणे कमीत कमी २८ रुपये शेतसारा भरणाऱ्यास मतदानाचा हक्क असे. शनिवार 9 जुलै 1938 पासून बाईंनी जिल्हा लोकल बोर्डमधील आरंभलीला कामाचा यद्न सलग 14 वर्षे अखंडपणे धगधत होता. त्यावेळी पुणे जिल्हा लोकल बोर्डमधील पन्नासपैकी 36 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, या 36 मधील एकमेव स्त्री उमेदवार होत्या शारदाबाई गोविंदराव पवार! तेव्हाचे अध्यक्ष होते शंकरराव मोरे.
बाईंना शंकररावांच्या जनताभिमुख, स्वच्छ कारभारातुन खूप काही शिकता आले. तो काळ स्वातंत्र्यपूर्व होता. त्या काली व्हॅनची नीट सोय नसायची. बारामतीहून एक खासगी गाडी पुण्याला येत असे. ती कोळशावर चालणारी असे. त्यामुळे पहाटेपासूनच वाहनचालकाला कोळसा पेटवावा लागे. त्यातून जी वाफ तयार होई त्यावर गाडी चालत असे, या गाडीतूनच बाई बारामती-पुणे-बारामती असा प्रवास करीत असत.
दर महिन्यातून एकदा बोर्डाच्या मीटिंगला हजर राहावे लगत असे. एकाच दिवशी दोन मीटिंग असत. पहिली एक वाजता होई. हि संपूर्ण बोर्डाची मीटिंग असे. दुसरी चार वाजता सुरु होई. हि विविध समित्यांची असे. बोर्डाच्या कामकाजात विविध समावेश असे. बाईंनी चौदा वर्षनमध्ये विविध समित्यांवर कार्य केले आहे. त्यातील काही काळ त्या बांधकाम समितीच्या चेरमनही होत्या. साधारणपणे पन्नास सदस्यीय सभेमध्ये बाई एकट्याच स्त्री सदस्य होत्या, बाकी सर्व पुरुष सदस्य असत.
तेव्हाच्या एकंदरीतच राजकीय,सामाजिक, आर्थिक घडामोडींचा विचार करता कोणतेही विचारस्वातंत्र्य, भाषण- लेखन स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य सरकारने कोणालाही बहाल केलेल नव्हते. तर दडपशाहीचा जोरदार वरवंटा सरकार संपूर्ण देशात फिरवीत होते. अशाच वेळी बाईंचे जबरदस्त कणखर व्यक्तिमत्व, एकट्या स्त्रीचे नेतृत्व, बोर्डातील कार्यातून दिसणारे कर्तृत्व व इविध विषयावर केलेले बुद्धिमान, विद्ववतापूर्ण वक्तृत्व झळकत राहिले.
बोर्डातील कामकाजाच्या निमित्ताने अशा मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. नेत्यांच्या देशाभिमानाने भारलेल्या व्यक्तिमत्वाचा बाईंच्या मनावर विलक्षण प्रभाव पडू लागला. घराबाहेरची जग उघड्या डोळ्यांनी त्या जाणून घेऊ लागल्या. त्यांच्याही मनात समाजाविषयीची, बांधिलकी निर्माण झाली. शिक्षणाचे महत्व तर त्या जाणून होत्याच पण त्याबरोबरच समाजाची व्यावहारिक बाजू समजून घेऊन याचे महत्व मुलांच्या मनावर बिंबविण्याचा हरप्रकारे प्रयत्न करू लागल्या.
बाईंच्या मुलांपैकी शरदरावांकडे बाईंसारखीच समोरच्याचे बोलणे नेमके समजून घेण्याची क्षमता आहे. तसेच उत्तम आकलनशक्ती व अचूक निर्णयक्षमता आहे. अतिशय जिद्दी, करारी व्यक्तिमत्व शेवटच्या दिवसात मात्र नियती नावाच्या अजब खेळापुढे हतबल झाले. शेवटची दोन अडीच वर्षे तर त्या आजारीच होत्या.
तशातच कावीळ झाली, शेवटी शेवटी त्या बेशुद्धावस्थेत होत्या .तशातच एक महान पर्व १३ ऑगस्ट १९७५ रोजी दिवंगत झाले. तेव्हा शरदराव महाराष्ट्र राज्याचे शेती खात्याचे मंत्री होते., शरदराव मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळाले नाही.
बाईंचे करारी व्यक्तिमत्त्व आपण थेट शरद पवारांमध्ये बघतो. शरद पवारांमध्ये आईचे अनेक गुण आहेत. आईच्या पावलांवर पावलं ठेवत शरद पवारांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक आगळी वेगळी ओळख कमावली. आजही त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण येते. त्यांनी काही वर्षांपूर्वी आईला भावनिक पत्र लिहिले होते. शरद पवार यांचा आदर्श असलेल्या त्यांच्या आई कित्येकांना प्रेरीत करणाऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.