Amol Kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अमोल कोल्हेंची तोफ; निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर मोठी पडझड झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार रस्त्यावर उतरले असून सबंध राज्याचा दौरा ते करणार आहेत. पक्षामध्ये सध्या फेरबदल आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्याचं काम सुरु असल्याचं दिसून येतंय.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे एक जबाबदारी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली. भाजप, राष्ट्रवादीचा दुसरा गट यांच्यावर तुटून पडण्यासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पक्षाने त्यांना जबाबारी दिल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचं ट्वीट

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते.

असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे आज, उद्या होणारा मंत्रिमंडळ विस्तार दिवसेंदिवस पुढे ढकलत चालला आहे. अजित पवार यांच्या गटाला खातेवाटप राहिलेलं आहे. शिवाय शिवसेनेला आणखी काही मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT