भाजपा आमदार नितेश राणे सध्या वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल कोल्हे यांना नितेश राणेंनी लक्ष्य केलं होतं. 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू असं म्हणाले होते त्यांच्या या टीकेला खासदार अमोल कोल्हेचं प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांच्या या टीकेवर खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना राणे यांना खुलं आव्हान दिलं आहे. कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहेत ते? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
पुढे कोल्हे म्हणाले की, भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजतात, बोलतांना त्यांचे संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. तर नाव न घेता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तर मी उजळ माथ्याने सांगतो की कला क्षेत्र माझ्या उत्पन्नाच साधन आहे, असंच राणेंनी सांगावं असं आव्हान कोल्हे यांनी राणेंना केलं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे असंही कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते नितेश राणे?
भाजपा आमदार नितेश राणे सध्या वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल कोल्हे यांना नितेश राणेंनी लक्ष्य केलं होतं. 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू. इतकंच नाही तर, अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच. 'कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2014 मध्ये आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.