PM Home Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. मात्र त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरुन (Social media news) देखील त्यावर नेटकऱ्यांनी साधक बाधक मतमतांतरे व्यक्त केले आहेत. सीतारामन यांनी या पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या अंतर्गत आणखी 80 लाख घरं उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यावर खासदार राहुल शेवाळे (Mp Rahul Shevale) यांनी देखील व्टिट करुन त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल शेवाळे यांनी ट्विट करुन मुंबईसह राज्यभरातील विविध शहरांत रेल्वे रुळांलगत किंवा रेल्वेच्या जमिनीवर गेल्या 50 वर्षांपासून जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या झोपडी धारकांना '#पंतप्रधान_आवास_योजनेत ' सामावून घेण्यासाठी नवे केंद्रीय पातळीवर नवे धोरण बनवावे. अशी लेखी विनंती खासदारांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे. हे धोरण निश्चित होईपर्यंत झोपडपट्ट्यांवरील कारवाई रेल्वेनं थांबवावी, अशीही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत याबाबत येत्या 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, विरार, वसई, पालघर, पिंपरी चिंचवड, नागपूर इथल्या रेल्वेच्या जमिनीवर राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.