MP Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'दोन महिन्यांनंतर राज्यातील परिस्थिती बदलेल'; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

हेमंत पवार

‘‘सध्या शिक्षण क्षेत्रापुढे नवीन आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलून आधुनिकतेचा विचार करून रयत शिक्षण संस्थेने पुढे जावे. त्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत.''

कऱ्हाड : रयत शिक्षण संस्थेला शरद पवार यांनी पाच कोटी रुपये जाहीर केले, असे कालेतील विकास पाटील यांनी सांगितले, ते चुकीचे आहे. महाराष्ट्र सरकारची सत्ता आमच्या हातात असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडे मी कुंभोजच्या शाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचा सन्मान व्हावा म्हणून मोठी देणगी द्यावी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करावी, असे सांगितले होते. हा माझा सल्ला राज्य सरकारने मान्य करून बजेटमध्ये पाच कोटींची तरतूद केली. त्यातील तीन कोटी रुपये वर्ग केले आहेत. अजून दोन कोटी रुपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. आता दोन महिन्यांनंतर तुम्ही परिस्थिती बदलाल, त्यानंतर राहिलेली रक्कम संस्थेला लगेच देऊ, असे सूचक वक्तव्य खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काले येथे केले.

दरम्यान, शाळेला एक कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कालेत लोकसभागृहासह रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) निधीतून उभारलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर ते बोलत होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, संस्थेचे संचालक अॅड. रवींद्र पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, शाळेचे पहिले विद्यार्थी आर. एम. कोळी, कालेतील विकास पाटील, अजित देसाई, संजय देसाई, सागर देसाई, के. एन. देसाई, सौरभ कुलकर्णी, सज्जन साळुंखे, विजय यादव, विक्रम खटावकर, पांडुरंग पाटील, वसंतराव पाटील आदी उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, ‘‘काले गावाला स्वातंत्र्यसंग्रामाची परंपरा आहे. या गावात कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा सुरू केली. या गावातील इस्माईल मुल्ला यांनी अण्णांना मोठी साथ दिली. कालेत लोकवर्गणी आणि संस्थेच्या माध्यमातून चांगली वास्तू उभी राहिली आहे. या शाळेत अनेक उपक्रम हाती घेतले पाहिजेत. त्यासाठी शाळेला अधिक निधी द्यावा, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. काले गावाने एखादे काम हातात घेतल्यावर ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाही, हा गावाचा लौकिक आहे. या शाळेला आणखी सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपये दिले जातील,’’ अशी घोषणा त्यांनी केली.

MP Sharad Pawar

ते म्हणाले, ‘‘सध्या शिक्षण क्षेत्रापुढे नवीन आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलून आधुनिकतेचा विचार करून रयत शिक्षण संस्थेने पुढे जावे. त्यासाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत. देशातील एक चांगली शिक्षण संस्था म्हणून रयत संस्थेचा गौरव झाला आहे. आधुनिकतेचा आधार देऊन अधिक सुविधा कालेत देऊन रयत पॅटर्नमधून बाहेर पडलेल्या मुला-मुलींनी चांगले काम करावे.’’ यावेळी श्री. दळवी, डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. करपे यांनी आभार मानले.

विकास पाटील यांचे कौतुक

संस्थेच्या कामासाठी अहोरात्र कष्ट केलेले विकास पाटील यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा गौरव केला. यावेळी श्री. पवार यांनी विकास पाटील यांनी शाळेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दाढी न करण्याचा निर्धार केला. आज १२ वर्षांनंतर शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विकास पाटील आज दाढी करतील, अशी टिप्पणी केली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी पातळीवर बंद; मार्केट कॅप 4 लाख कोटींनी वाढले

Hair Growth Hack :  ना तेल- ना हेअरमास्क; रोज सकाळी या पदार्थाचे करा सेवन केस १०० च्या स्पीडने वाढतील!

Dombivli News : धक्कादायक! अडीच वर्षाच्या आपल्या चिमुरडीचा गळा दाबून नंतर आईने उचलले टोकाचे पाऊल

Dombivli Crime : चोरलेली बाईक जाग्यावर आहे का पहायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले सराईत चोरटे

Amazon Great Indian Festival : ॲमेझॉनचा फेस्टिव्ह सेल; आयफोन,सॅमसंग अन् शाओमी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काउंट,ऑफर्स बघाच

SCROLL FOR NEXT