Shrikant Shinde vs Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shrikant Shinde : 'एक बार जो हमने कमिटमेंट कर दी, तो हम किसी की भी नही सुनते..'; खासदार शिंदेंचा ठाकरेंना टोला

युवकांना चांगल्या प्रकारची व्यासपीठे मिळवून देण्याचे काम करणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

'प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केल्यास ध्येय गाठता येते. त्यासाठी प्रयत्न आणि सातत्य महत्त्वाचे आहे.’

मुरगूड : ‘एक बार जो हमने कमिटमेंट कर दी, तो हम किसी की भी नही सुनते.., हे आम्हा शिंदे कुटुंबीयांचे तत्त्व आहे. या आधी तुम्ही एका युवा नेत्याला कार्यक्रमासाठी बोलावले होते, पण ते आले नाहीत. त्यामध्ये आमची तुलना व्हायला नको. म्हणून आजारी असतानादेखील मी आलो आहे,’ असा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव न घेता लगावला.

येथील (Murgud) सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या संजयदादा यूथ फेस्टिव्हलमध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक सांस्कृतिक मंचचे उद्‌घाटन खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, युवा सेनेचे किरण साळी, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, ॲड. वीरेंद्र मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार शिंदे म्हणाले, ‘युवकांना चांगल्या प्रकारची व्यासपीठे मिळवून देण्याचे काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केल्यास ध्येय गाठता येते. त्यासाठी प्रयत्न आणि सातत्य महत्त्वाचे आहे.’

खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे.’ आमदार आबिटकर म्हणाले, ‘युवकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देण्याचे काम खासदार मंडलिक करत आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT