Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

गणेशोत्सवात डॉल्बी वाजलीच पाहिजे; उदयनराजेंचं पोलिसांना थेट चॅलेंज

डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.

सातारा : जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम (Dolby System) वाजलीच पाहिजे, असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केलं. उत्सव काळात डॉल्बी सिस्टीमला परवानगी नसल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितल्यानंतर, आज खासदार उदयनराजेंनी डॉल्बी का नको याचं कारण द्यावं, असा जाब प्रशासनासह पोलिसांना विचारलाय.

डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे भोसले आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात काही कामानिमित्त खासदार उदयनराजे यांनी बैठका घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवण्यास पोलीस प्रशासनानं परवानगी दिलीय. आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्या पाठपुराव्यामुळं हे यश आलं. सातारा जिल्ह्यात सात वर्षांपासून जिल्हा प्रशासनानं डॉल्बी वाजवण्यास बंदी घातली होती. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी डाॅल्बीला परवानगी दिलीय. त्यामुळं आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे डॉल्बी व्यावसायिकांनी आणि मंडळाच्या अध्यक्षांनी आभार मानलेत.

उदयनराजे म्हणाले, "साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी (Satara Police) प्रशासनाला डॉल्बी का नको आहे. याचं त्यांनी आम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यावे. सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली जावी, याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पोलिस प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता. तेव्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. मात्र, नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली. व्यावसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासनानं एकदा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली आहे. डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सातारा शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते, असा दुटप्पीपणा व्हायला नको.

केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनानं डाॅल्बीला परवानगी का नाही याचं पत्रक काढावं. प्रशासकीय अधिका-यांनी प्रत्येक घटकाचा विचार करुन निर्णय घेतले पाहिजेत. डाॅल्बी वाजलीच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. दोन-तीन तासांनी काय आभाळ कोळसणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT