Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

'त्या' समाजकंटकांना त्वरित शोधून काढा : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान केल्याप्रकरणी बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही कर्नाटक प्रशासनाला (Karnataka Government) कडक शब्दांत इशारा दिलाय.

खासदार उदयनराजे यांनी कर्नाटक प्रशासनाला इशारा देताना म्हंटलंय, संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झालीय. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारनं त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, असा इशारा त्यांनी ट्विटव्दारे दिलाय. कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवलाय.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या दगडफेकीत 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात जमावबंदी लागू करण्यात आलीय. त्यातच अनगोळ येथील संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केलीय. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केले असून खबरदारी म्हणून तालुक्यात कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केलाय.

महिला कार्यकर्त्यांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

बंगळूर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर, ठिकठिकाणी शिवाजी राजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यास सुरुवात झालीय. मात्र, शिवाजी उद्यान येथे गर्दी करण्यास मनाई केली जात आहे. तरीही माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी उप महापौर मधूश्री पुजारी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रेणू मोरे आदी महिला कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करणार असल्याचे सांगत पोलिसांचे कडे तोडून उद्यानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना आत जाऊन दुग्धाभिषेक करण्याची परवानगी दिलीय. त्यानंतर मराठा समाजाचे किरण जाधव, रवी कोकितकर, गणेश दड्डीकर, मदन बामणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उद्यानात जाऊन पूजन केले.

कायदा हाती घेणाऱ्यांची नाही गय : मुख्यमंत्री बसवराज

बेळगावमध्ये घडलेल्या दगडफेक घटनेचा निषेध करतो. तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईबाबत आदेश गृहमंत्र्यांना दिले असून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. छोट्या-मोठ्या कारणासाठी कायदा हातात घेऊन खासगी, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश बजावले असून कोणत्याही कारणाने हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या संदर्भात गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून सखोल चौकशी केली जाईल व प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील, अशी माहिती त्यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT