'माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे.'
सातारा : सातारा पालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) जशी जवळ येत आहे, तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे वाद रंगला असतानाच आता उदयनराजेंनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय. सातारा पालिकेत (Satara Municipality) आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतंही गैर काम करत नाही, गैर खपवून घेत नाही. तसं असतं तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? असा सवाल करत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधलाय.
साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, पाच रूपयाचा घोटाळा केला असता तर ते (शरद पवार) फोकस करून माझ्यावर आरोप केलं असते, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधलाय. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) केलेल्या आरोपाला त्यांच्याच शैलीत उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिलं. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही टीका केलीय.
उदयनराजे पुढं म्हणाले, वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. पण, भ्रष्टाचाराचे स्पेलिंग मला माहिती नाही. तसे असते तर जे ज्येष्ठ विचारवंत जे माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे. सत्ता असो व नसो... नगरसेवकांपासून मी सुरवात केली. त्यावेळेपासून आम्ही तळमळीने काम करत आहोत. आम्ही अनेक आंदोलने केली आमच्यावर केसेस झाल्या. पण आमच्याकडे सत्ता नसल्याने पर्याय नव्हता. नियोजन शून्य अक्कल शून्य असे नावे ठेवली गेली. गावाने ओवाळून टाकलेली उदयनराजे व त्यांची सगळी टीम आहे, असे आरोप झाले. पण आम्ही नागरीकांच्या आरोग्याला धोका होता कामा नये, अशी आमची भावना आहे. आम्ही कोणतंही गैर काम करत नाही. तसेच गैर कामे खपवून घेत नाही. तसे केले असते त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? पाच रूपये इकडे तिकडे झाले असते तरी ते फोकस करून आमच्यावर आरोप केलं असते, अशा शब्दात त्यांनी पवारांवरही निशाणा साधलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.