मुंबई : एमपीएससी परीक्षेतून कृषी विभागाच्या वगळलेल्या परीक्षांचा अखेर पुन्हा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सुरु असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. त्यामुळं आता कृषी विभागाच्या २५८ जागांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा 2024 परीक्षेतील २५८ जागांपैकी कृषी उपसंचालकाची 48 पदं, तालुका कृषी अधिकाऱ्याची ५३ पदं, कृषी अधिकाऱ्याची 157 पदं भरण्यात येणार आहेत. यासाठी एमपीएससीनं आज नव्यानं प्रसिद्ध केलेली जाहिरात तपासावी.
यासाठी एमपीएससी करण्याऱ्या लाखो विध्यार्थ्यांनी तीन दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दाखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्य सेवेच्या होणाऱ्या परीक्षेत समावेश करण्यात आला आहे.
अर्ज सादर करण्याचा दिनांक - २७ सप्टेंबर २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - १७ ऑक्टोबर
एसबीआयमध्ये चलनाद्वारे पैसे भरण्याचा अंतिम दिनांक - १९ ऑक्टोबर २०२४
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - २१ ऑक्टोबर २०२४
परीक्षेचा दिनांक - रविवार, १ डिसेंबर २०२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.