Avaliya Pravasi Sakal
महाराष्ट्र बातम्या

एसटीचं आगळवेगळं रूपडं जगाला दाखवणारा अन् सफर घडविणारा "अवलिया प्रवासी"

दत्ता लवांडे

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गावाखेड्यातील, दुर्गम भागातील कष्टकरी, कामगार आणि शेतकरी वर्गाची नाळ शहरांशी जोडणारा आणि चांदा ते बांद्यातील लोकांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे आपली लालपरी. गावातल्या, मातीतल्या, काट्याकुट्याच्या रस्त्याने धूळखात ती अविरतपणे आजपर्यंत आपलं काम चोखपणे पार पाडत आलीये.

सरकारं बदलली, नेते बदलले, काळ बदलला पण अख्ख्या महाराष्ट्राचं ओझं खांद्यावर पेलणारी लोकवाहिनी अजूनही तोऱ्यात उभा आहे. आजच्या धावपळीच्या युगातही एसटीचं दिवसेंदिवस बदलणारं रूपडं जगासमोर ठेवतोय तो "अवलिया प्रवासी" म्हणजे रोहित धेंडे. लालपरीसाठी या पठ्ठ्याने आपलं सर्वस्व वाहून घेतलंय.

Avaliya Pravasi

तिकीट-तिकीट म्हणत आलेल्या कंडक्टरने लोखंडी पेटीतून काढून दिलेले ते कागदी तिकीटं अनेकांनी अजूनही जपून ठेवलेत. हा काळ आपल्या सर्वांच्या आयुष्यातला एक माईलस्टोन होता. एसटीतून आईसोबत मामाच्या गावाला जाताना कित्येकांनी हा अनुभव घेतला असेल. बसच्या खिडकीतून येणारा गार गार वारा, पावसाळ्यात खिडकीतून आत येणारं पाणी हा त्या काळातील समृद्ध करणारा अनुभव जतन करून ठेवण्यासारखा आहे.

पण गावाखेड्यातल्या फाट्या फाट्यावरच्या लोकांच्या जीवनवाहिनीने आज आधुनिकतेची चादर अंगावर घेतलीये. एकेकाळी 'लाल डबडं' म्हणून हिणवली जाणारी एसटी आज निरनिराळ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज झालीये.

ST Bus

सध्या सोशल मीडियाचा जमाना. तसं बघितलं तर प्रत्येकजण आपल्याच मोबाईलमध्ये गुंग. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि आधुनिक गोष्टींमुळे आपण हळूहळू परंपरागत गोष्टीसुद्धा विसरत गेलो. इतिहास, वारसा, संस्कृती या गोष्टींबरोबरच अभिमानाच्या गोष्टीसुद्धा हळूहळू लुप्त होताना दुर्दैवाने आपल्याला पाहाव्या लागतायेत.

लालपरीचा अभिमानास्पद इतिहासही आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून "अवलिया प्रवासी" लालपरीचा समृद्ध वारसा जपण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मागच्या १५ वर्षांपासून प्रयत्न करतोय. त्याच्या आवडीच्या याच कामातून त्याला समाधान मिळतं.

दुर्गम भाग, डोंगरदऱ्या, वाड्यावस्त्या, जंगल असो किंवा दुष्काळी भागातील एखादा डेपो असो. सगळ्या एसटी डेपोचा प्रवास करत या अवलियाने अख्ख्या महाराष्ट्र पालथा घातलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून एसटीच्या नव्या गाड्या, नव्या योजना, गाडीतील सुसज्ज आसन व्यवस्था आणि सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रोहितचा असतो. "बस फॉर अस" या फाऊंडेशनच्या माध्यमातून तो एसटीचा प्रवास आपल्याला घडवून आणतो.

ST Bus

रील्स, व्हिडिओमधून एसटीचं बदलतं रूपडं जगाला दाखवण्याचं काम तो करतोय... तेही न थांबता. पण एसटीच्या सतत बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय कमी होण्यासाठी त्याने एक अॅप काढण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या अॅपचा फायदा भविष्यात प्रवाशांना होणार आहे. आपल्या छंदाचा लोकांना फायदा होतो याचं मनापासून समाधान वाटतं असं रोहित सांगतो.

१ जून रोजी एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. परिवहन महामंडळाकडून छापण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकमध्ये अवलिया प्रवासी रोहित धेंडेबद्दल सविस्तर लेख आलाय. हीच त्याच्या कामाची पोचपावती असल्याचं समजून तो त्यातच त्याच्या कामाचं समाधान मानतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT