दोन वर्ष कोरोना आणि पाच महिने कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटी महामंडळाची अर्थिक परिस्थिती खडतर बनलीय. मात्र, यंदाच्या दिवाळीत महामंडळाला चांगलाच फायदा झाला आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांना भत्ते सोडा, वेळेवर पगारही नाही. इतकेच नव्हे तर अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. (msrtc staff not even getting salary on time time to reach out to the government for grants)
११ दिवसांत तब्बल २७५ कोटी रुपये उत्पन्न झाले. यातून थकीत रक्कम मिळावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
महागाई भत्तावाढीची फाइल सरकारकडे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आली. त्यावर अजून तरी निर्णय झालेला नाही. ही फाइल मंजूर झाल्यास दिवाळीत मिळालेल्या वाढीव उत्पन्नातून थकीत रक्कम मिळण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे.
शिल्लक रजेसह इतर प्रकारची थकबाकी मिळण्यास दीर्घ कालावधी लागतो. या रकमा मिळण्याच्या प्रतीक्षेत ११० सेवानिवृत्त कर्मचारी दिवंगत झाले, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
दरम्यान, डिझेल आणि साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. प्राप्त उत्पन्नातून हा खर्च काही प्रमाणात भागविला जातो. मात्र, वेतनासाठी सरकारपुढे हात पसरावे लागतात. स्वत: वेतन खर्च भागवता येईल, इतके उत्पन्न येत नाही.
नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलत योजनांची रक्कम शासनाकडून वेळेवर मिळत नाही. कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत २ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम महामंडळाला मिळाली. यातून कर्मचाऱ्यांचे पगार होत गेले, पण थकबाकीसाठी ताटकळतच ठेवले जात आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ तातडीने दिले जात नाही. अशी माहिती समोर आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.