ST Bus sakal
महाराष्ट्र बातम्या

ST STRIKE: सरकारने निवडला खासगी वाहतुकीचा पर्याय

ST कर्मचारी संप मागे घेत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे: एसटी महामंडळचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरण्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यावर त्यांना प्रवासी वाहतूक बंद करावी लागणार आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. अनेकांना कामावर परतण्यासाठीही अडचणी होत आहेत तर, अनेकजण गावांकडे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मालवाहतूक करणाऱ्या तसेच स्कूल बस आणि खासगी बसचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतचा आदेश सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रसिद्ध झाला.

तत्पूर्वी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते की, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा राज्य सरकारने विचार करावा. परंतु, प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरण्याचे कारण काय ? प्रवासी पैसे देऊन वाहतुकीची सुविधा वापरतात. त्यामुळे त्यांनाही न्याय दिला पाहिजे. राज्यात १० हजारपेक्षा जास्त खासगी प्रवासी बस आहेत. तसेच विद्यार्थी वाहतूक, कामगार वाहतूक आणि पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या बस सध्या पडून आहेत. त्या बस राज्य सरकारने अधिग्रहीत कराव्यात आणि प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळेल. तसेच एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करण्यास या बसचालकांना बंधकारकरक करता येईल.’

राज्य सरकारने या पूर्वी ५ - ६ वेळा खासगी बस अधिग्रहीत करून त्यांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा असा निर्णय घ्यावा. प्रवाशांची गैरसोय टाळणे गरजेचे आहे. नागरिक गावांकडेच अडकले तर, त्यामुळे शहरांतील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. त्यातून सुरू झालेल्या अर्थचक्राला खीळ बसेल, अशी भीतीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT