Mughal History  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mughal History : औरंगजेबाचं प्रेम असलेल्या गणिकेने त्याच्या नातवाशीच केलं लग्न

मुघलांचा सर्वात क्रूर सम्राट औरंगजेब हा धार्मिक कट्टरतेसाठी आणि भावांच्या हत्येसाठी ओळखला जातो

सकाळ डिजिटल टीम

Mughal History : मुघलांचा सर्वात क्रूर सम्राट औरंगजेब हा धार्मिक कट्टरतेसाठी आणि भावांच्या हत्येसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या कार्यकाळात संगीतावर बंदी घातली आणि सत्ता मिळवण्यासाठी भावांचे रक्त सांडले. पण तोही एका गणिकेच्या प्रेमात पडला होता. तिचं नाव होतं लाल कुंवर. लाल कुंवर केवळ नृत्यांगना असली तरी कालांतराने तिचा मुघल साम्राज्यातील हस्तक्षेप इतका वाढला की, सल्तनतमध्ये तिचीच चर्चा सुरू झाली.

मुघल सल्तनतमधील बादशहा आणि महिलांबाबत नेहमीच चर्चा होत आल्या आहेत. या बाबतीत औरंगजेबही त्याच्या मागच्या पिढ्यांसारखाच होता. पण गमतीची गोष्ट म्हणजे आधी औरंगजेब आणि लाल कुंवर यांची चर्चा झाली. यानंतर मुघल सल्तनतमध्ये औरंगजेबाचा नातू आणि लाल कुंवर यांच्या जवळीकीच्या कहाण्या रूढ झाल्या. जरमानी दास यांनी त्यांच्या पुस्तकात या कथांचा उल्लेख केला आहे.

जरमानी लिहितात की, धर्मांधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाचं एका रखेलीवर प्रेम होतं यावर फार कमी लोक विश्वास ठेवतील. पण हे सत्य आहे. लाल कुंवर ही एक गणिका होती जी मुजरा करून बादशहाचं मनोरंजन करायची. पण हळूहळू औरंगजेब तिच्या इतका प्रेमात इतका वेडा झाला की मुघल सल्तनतमध्ये तिचा हस्तक्षेप वाढू लागला. लाल कुंवरचा दर्जा इतका वाढला की तिला राजेशाही सदस्याप्रमाणेच आदरही दिला गेला. औरंगजेबाच्या जवळच्या लोकांमध्ये तिची गणना व्हायची.

राणीपेक्षा मोठा दर्जा

ती कुठेही जायची तेव्हा सैनिकांचा एक गट तिच्या समोरून चालत असे. ढोल ताशांच्या गजरात तिच्या आगमनाची माहिती देण्यात यायची, रस्त्यावरील गर्दी हटवली जायची, रस्ते मोकळे केले जायचे.

औरंगजेबाच्या मुली आणि बहिणींना मुघल सल्तनतमधील लाल कुंवरचे वाढते वर्चस्व आवडत नव्हते, वस्तुस्थिती अशी होती की ती शाही कार्यात सल्ला देत असे. तिला न आवडणारा राजाचा क्रम ती बदलत असे.

औरंगजेबाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची स्थिती दिवसेंदिवस बदलत गेली. दिल्लीतील लाल बंगला येथे त्यांच्यासाठी महाल बांधण्यात आला. औरंगजेब म्हातारा झाल्यावर मुघल सल्तनतची चमक कमी होऊ लागली. त्याचे पुत्र आझम शाह आणि बहादूर शाह अल्पकाळ सत्तेवर राहिले. यानंतर बहादूरशहाचा मुलगा जहांदरशहा याच्या हाती सत्ता आली. जहांदर तर याच्याही पुढे गेला. तो ही लाल कुंवरवर प्रेम करू लागला.

यामुळेच मुघलांच्या शेवटच्या तीन पिढ्यांमध्ये लाल कुंवरची नशा होती. असं म्हणतात की, जहांदार शाहने तिला पहिल्यांदा गाताना पाहिले तेव्हा त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. दोघांच्या आकर्षणाचं रुपांतर प्रेमात झाले. प्रेम इतके वाढले की त्याने लाल कुंवरशी लग्न केले आणि तिचं नाव इम्तियाज महल ठेवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT