कुख्यात डॉन अरुण गवळी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरुण गवळी वरील खंडणीच्या आरोपातील महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरणी लावण्यात आलेल्या मोक्का कायद्या संदर्भातील ही कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का कोर्टात ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात डॉन अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरणामध्ये लावण्यात आलेल्या मोक्का प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आहे. या खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी अरुण गवळीच्या वकिलांना या कागपदत्रांची मागणी केली होती. ज्यानंतर गुन्हे शाखेने कोर्टात याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा अरुण गवळी आणि त्याच्या साथीदारांवर आरोप आहे. गेल्या महिन्यात कागदपत्रांवरून न्यायालयानं पोलिसांना खडसावलं देखील होतं.
दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा, असंही न्यायलयाने पोलिसांना म्हटलं होतं. मात्र आता ही कागदपत्रेच गहाळ झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केल्याचा आरोप होता. बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होते. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.