Gajanan and Rama 
महाराष्ट्र बातम्या

Mumbai : कौतुक नको, फक्त माणुसकीची वागणूक द्या; रेल्वेत बाटल्या वेचणाऱ्या पदवीधर तरुणाला अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

- नितीन बिनेकर

रेल्वे परिसरात पाण्याच्या रिकाम्या बॉटल वेचणाऱ्यांकडे रेल्वे प्रवासी शंकेच्या नजरेने बघतात. मात्र, रेल्वे रुळावर अपघात झाल्यास, रेल्वे स्थानकावर आजारी पडलेल्या नागरिकांच्या मदतीला सर्वप्रथम धावून येणारे हेच तरुण असतात. नुकतचं सीएसएमटी स्थानकावर फिट आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवून या तरुणांनी आदर्श ठेवला आहे.

यापुर्वीही या तरुणांनी रेल्वेरुळावरच्या अपघातग्रस्तांची मदत केली आहे. यातील एक तरुण पदवीधर असून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईच्या रेल्वे रुळावर कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे सांगितले. आम्हाला काही नको केवळ माणुसकीच्या वागणूकीची अपेक्षा आहे अशी या तरुणांची भावना आहे.

गुरुवारी सीएसएमटी स्थानकात एका प्रवाशांला फिट आली. तो बेशुद्ध होऊन जागच्या जागी कोसळला. भरदुपारी ही घटना घडली तेव्हा स्थानकावर शेकडो लोक उपस्थित होते. मात्र कुणी मदतीला आले नाही. मात्र कचरा वेचणारे हे तरुण धावले, त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. प्रथमोपचार करुन या प्रवाशाला त्यांनी स्टेशन मास्तरच्या कॅबीनमध्ये घेवून गेले. गजानन आवरकर आणि रामा धामोळे अस या दोन तरुणांचे नाव असून ते मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर रिकाम्या बॉटल वेचण्याचे काम करतात.

गजानन आणि रामा हे तरुण अकोल्यातील एका छोट्याश्या गावातले आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यामुळे काही तरी कामाच्या शोधात मुंबई गाठली. काम शोधले मात्र काही मिळाले नाही, अखेर दोघांनी सीएसएमटी स्थानक आणि रेल्वे रुळावर रिकाम्या पाण्याचा बाटल्या उचलणे सुरु केले. या माध्यमातून त्यांना दिवसाला ४०० ते ५०० रुपये मिळतात. मात्र कचरा वेचतांना त्यांनी प्रामाणिकता सोडली नाही. अनेकदा प्रवाशांचे हरवलेले, सोडून गेलेले सामान त्यांनी रेल्वेकडे जमा केले आहे. याशिवाय स्थानकात किंवा रेल्वे रुळावर कुणाचा अपघात झाला तरी त्यांच्या मदतीला हे तरुण कायम पुढे असतात.

माणूसकीची वागणूक मिळावी

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सीएसएमटी स्थानकांत कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे गजाननने सकाळला सांगीतले. हे काम करुन दररोज ४०० ते ५०० रुपये सुटतात. मी आठवड्याला घरी पैसै पाठवतो. रेल्वेत रिकाम्या बाटल्या उचलताना अनेकजण आमच्याकडे संशयाने बघतात.हे मान्य करतो रेल्वेत चोरी कऱणारे लोक असतात. मात्र सर्वजण चोर नसतात. मात्र आम्ही माणसं आहोत. आजपर्यत अनेक अपघातग्रस्तांची मदत आम्ही केली आहे. अपघातग्रस्तांना रेल्वे रुळावरून बाहेर काढून आम्ही रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.याशिवाय रेल्वे गाड्या पँसेजर विसरुन गेलेल सामान देखील रेल्वे पोलिसांकडे पवले आहे. अनेकांनी आमच्या कामाचे कौतुक केले आहे. आम्हाला काही नको, केवळ एक माणूस म्हणून माणुसकीची वागणूक मिळाली एवढीच अपेक्षा आहे.

हे काम सोडायचं

यातील रामा धामोळे हा तरुण पदवीधर आहे. सकाळशी बोलताना त्याने सांगीतले की माझी पत्नीचा मृत्यू झाला असून मला छोटा मुलगा आहे. परिस्थिती माझी पत्नी वारली असून मला एक छोट बाळ आहे. घरची परिस्थिती आणीबाणीची होती, हाताला काम लागत नव्हते त्यामुळे मी गजानन आवरकर याच्यासोबत रिकाम्या बॉटल गोळा करण्याचे का करतो. त्यातून मिळालेल्या पैशातून माझे घर चालतं. रिकाम्या बॉटल गोळा करताना अनेकदा पोलिस चौकशीला सामोरे जावे लागले. रेल्वेत सर्वाधिक मोठी समस्या मोबाईल, पॉकेट आणि बॅग चोरीची आहे. त्या चोरांच्या शोधात आमची सुद्धा चौकशी केली जाते. पोलिसांच्या जाचाला कंटाळून मी आता दुसरे काम शोधत आहे.

मदत करतानाही संशय

तीन वर्षात अंसख्य जखमी प्रवाशांची मदत या तरुणांनी केली. रेल्वे ट्रॅकवर जखमी झालेल्यांना प्रवाशांच्या मदतीसाठी कुणीही पुढे येत नसतात असा आमचा अनूभव आहे. माणुसकीच्या नात्याने मानवतेच्या नात्याने आम्ही पुढे जाऊन हे काम करत आलो आहे. मदत करत असताना भले, बुरे अनूभव वाट्याला आले आहेत. जखमी प्रवाशांची मदत करत असताना आमच्याकडे पोलिस शंकेच्या नजरेने बघतात. त्याचा मनाला खूप त्रास होतो. केवळ आम्ही कचरा वेचणारे आहोत म्हणून आजपर्यंत कुणीही आमच्या कामाची दखल घेतली जात नाही. अशा भावना या तरुणांनी सकाळकडे व्यक्त केली आहे.

रेल्वे ट्रॅकवरील कचरा उचलण्याचे काम हे तरुण करतात.रेल्वे ट्रॅकवर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी हे तरुण कायम पुढे असतात. कचरा वेचणारे सर्वचजण चोर नसतात, त्यातील बहुतांश प्रामाणिकही असतात. अशा तरुणांची रेल्वेला नेहमीच मदत होते.त्यामुळे या तरुणांची रेल्वेने नोंदणी केली पाहीजे आणि त्यांना स्टेशनवर छोटे मोठे काम करण्यासाठीचे परवाने द्यायला हवे, जेणेकरुन या तरुणांना आयुष्य सन्मानाने जगता येईल.

- समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT