Sea level in Mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

Sea level in Mumbai: मुंबईतील 10 टक्क्यांपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली जाणार; CSTEP ने व्यक्त केला धोका...

Rising sea levels: हवामान बदलामुळे भारतीय किनारपट्टीवरील १५ शहरांवर भूतकाळात आणि भविष्यातील परिणामांचा ‘सीएसटीईपी’ने अभ्यास केला. त्यात चेन्नई, मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगळूर, विशाखापट्टण, कोझिकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, थुथुकुडी आणि यानम या शहरांतील पर्यावरणीय बदलांचे निरीक्षणे नोंदविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

climate crisis: हवामान बदलामुळे समुद्राची पाणीपातळी वाढत असल्यामुळे २०४० पर्यंत मुंबईतील दहा टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भारतातील किनारपट्टीवरील शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका असल्याचा इशारा बंगळूर येथील ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’च्या (सीएसटीईपी) अभ्यासात देण्यात आला होता.

हवामान बदलामुळे भारतीय किनारपट्टीवरील १५ शहरांवर भूतकाळात आणि भविष्यातील परिणामांचा ‘सीएसटीईपी’ने अभ्यास केला. त्यात चेन्नई, मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगळूर, विशाखापट्टण, कोझिकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, थुथुकुडी आणि यानम या शहरांतील पर्यावरणीय बदलांचे निरीक्षणे नोंदविण्यात आली.

मुंबईला सर्वाधिक धोका

एकविसाव्या शतकाअखेरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व १५ शहरांमधील समुद्रपातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यातही सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे नमूद केले आहे. २१०० पर्यंत मुंबईतील समुद्राची पाणीपातळी ७६.२ सेंटीमीटरपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई व चेन्नईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, पारादीप, थुथुकुडी आणि यानाममध्ये जमीन बुडण्याचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे पिण्याचे पाणी, कृषी, जंगल, जैवविविधता तसेच आरोग्य क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या ३४ वर्षांत वाढलेली पाणीपातळी (सेंटीमीटरमध्ये)

मुंबईः ४.४

हल्दियाः २.७२

विशाखापट्टण: २.३८

कोचीः २.२१

पारादीपः ०.७१

चेन्नईः ०.६७९

२१०० पर्यंत वाढणारी पाणीपातळी (सेंटीमीटरमध्ये)

मुंबईः ७६.२

पणजीः ७५.५

उडुपीः ७५.३

मंगळूरः ७५.२

कोझिकोडः ७५.१

कोचीः ७४.९

तिरुअनंतपुरम:- ७४.७

कन्याकुमारी:- ७४.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT