central railway esakal
महाराष्ट्र बातम्या

Central Railway : रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर? अनेक स्थानकांत महाराष्ट्र गीत वाजले नाही

सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी मध्य रेल्वेकडून महाराष्ट्र स्थापना दिवसानिमित्त उपनगरीय रेल्वे स्थानकात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत वाजवायचे.

मुंबई - दरवर्षी मध्य रेल्वेकडून महाराष्ट्र स्थापना दिवसानिमित्त उपनगरीय रेल्वे स्थानकात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत वाजवायचे. परंतु, यंदा फक्त सीएसएमटी स्थानकांत सोडले तर दुसऱ्या स्थानकात महाराष्ट्र गीते ऐकून आले नाही. याशिवाय पश्चिम रेल्वेने तर महाराष्ट्र गीत वाजवलेच नाही. त्यामुळे रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापना दिनानिमित्य मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीत वाजवून प्रवाशांना महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा रेल्वेकडून देण्यात आलेल्या आहे.

परंतु, दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्य मध्य रेल्वेकडून उपनगरीय स्थानकांतील उद्घोषणातुन महाराष्ट्र गीत लावले जात होते. परंतु, यंदा उपनगरीय स्थानकांवर महाराष्ट्र गीत ऐकू येतील अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांना होती. परंतु, सीएसएमटी स्थानक सोडले, तर इतरही स्थानकात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत ऐकू आले नाही. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचा ट्विटर अकाऊंटवर फक्त शुभेच्छा संदेश देण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे कार्यक्रम रेल्वे घेण्यात आले नाही. त्यामुळे रेल्वेचा काभरवर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत.

सोशल मीडियावर नाराजी -

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर मंशत्र राज्य गीत का वाजविले जात नाही ? पश्चिम रेल्वेच्या अमराठी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र गीताचे वावडे का? असा प्रश्न ऍड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट रेल्वेला विचारला आहे.

तसेच रेल्वे अधिकाऱ्यानं समझ द्यावीत अशी मागणी रेल्वे राज्य मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्र्यांकडे ऍड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी केली आहे. अनेकांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या या कारभारावर समाज माध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, मराठी एकीकरण समितीने सुद्धा ट्विटरचा माध्यमातून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला सर्व स्थानकांवर महाराष्ट्र राज्य गीत वाजले पाहिजे. तशा दोन्ही रेल्वेला सूचना देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

प्रतिक्रिया -

महाराष्ट्र शासनाचा राज्यातील रेल्वेवर वचक राहिला नाही. मुंबईतील मराठी माणसाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. दरवर्षी महाराष्ट्र गीत सर्व रेल्वे स्थानकात वाजत होते. परंतु यंदा अनेक रेल्वे स्थानकाच्या महाराष्ट्र गीत वाजले नाही. आम्ही रेल्वेचा या कारभावराचा निषेध व्यक्त करतोय. आम्ही संघटना म्हणून रेल्वेला या संदर्भात जाब विचारणार आहोत.

- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ !

प्रतिक्रिया -

मध्य आणि पश्चिम रेल्वर वरिष्ठ अधिकारी बाहेर राज्यातून येतात. त्यामुळे मुंबई -महाराष्ट्र राज्याचे उत्सव त्यांना माहीत नसते. त्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्य अनेक स्थानकात आज महाराष्ट्र गीत वाजले नाही हे दुर्देवी आहे. आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करतोय, महाराष्ट्र राज्यातील स्थापना दिवसं आणि उत्सह साजरे करण्या संदर्भात अधिकाऱ्यांना समज द्यावीत.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष रेल यात्री परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT