Diwali 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Diwali 2022: मुख्यमंत्र्यांनी 'या' अभियानाला आज सुरुवात केली; यावेळी अंध विद्यार्थी...

संतोष कानडे

मुंबई

राज्य सरकारच्या वतीने 'प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान- २०२२'चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात झालीय. मंत्रालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अंध विद्यार्थ्यांसमक्ष ही शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री यांची उपस्थिती होती. यावेळी प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय.

''सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज आहे. कारण प्रदूषामुळे निसर्गाचा अपरिमित ऱ्हास होत आहे. शालेय विद्यार्थ्यांपर्यंत व्यापक जनजागृती होणं गरजेचं आहे. सरकारच्या वतीनेही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय प्लास्टिकबाबती सरकार गंभीर आहे.'' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. मंत्रालय परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली. अंध मुलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT