Mumbai Pune Expressway Accident sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai-Pune Expressway : अखेर साडेपाच तासांनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु; रस्त्यातून टँकर हटवला

संतोष कानडे

मुंबईः दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर एक केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामुळे चौघांना जीव गमवावा लागला. आता साडेपाच तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

मुंबईच्या दिशेने जाणारा केमिकलचा एक टँकर आज दुपारी १२ वाजता एका डिव्हाडरला धडकला आणि पलटी झाला. त्यानंतर तिथे आग लागली. पुलावर पलटी झालेला टँकर वरील रस्त्यासह पुलाखाही गेलं. त्यामुळे चौघांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. काही काळ एका बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली होती. परंतु ती पुन्हा बंद केली. आता साडेपाच तासांनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु झाली आहे. सध्या धिम्या गतीने वाहनं जात आहेत.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टँकरही हटवण्यात आलेला आहे. काही वेळात ही वाहतूक सुरळीत होईल. या अपघातात चौघांचा मृत्यू झालेलाल असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर खूप वेगाने जात होता, तेव्हा अचानक ड्रायव्हरचा टँकरवरील ताबा सुटल्या आणि टँकर कोसळला. यानंतर टँकरमधील केमिकल बाहेर उडालं आणि आगीचा भडका उडाला. दुपारी ११ वाजून ५० मिनीटांनी झालेल्या या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान अपघात झालेला टँकर उचलणारा क्रेन देखील जळून खाक झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT