Corona New Cases  Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत आता लॉकडाऊन होणार का? नवी रुग्णसंख्या २० हजारांपार!

शहरातील अक्टिव्ह रूग्णसंख्या 79,260 वर पोहोचली आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत 20, 181 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Corona Cases) तर दिवसभरात चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death In Mumbai ) झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यासह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून, नव्याने भर पडलेल्या रूग्णसंख्येमुळे शहरातील अक्टिव्ह रूग्णसंख्या 79,260 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Sing Chehel) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेल्यास लॉकडाऊनचा (Lock Down In Mumbai) विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले होते. त्यात आज 20 हजारांहून अधिक कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आल्याने मुंबईत खरच लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Mumbai Reports 20,181 New Cases of COVID19)

मुंबईत काल 15,166 कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले त्यानंतर आज यामध्ये 5 हाज रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मुंबईचा सकारात्मकता (Mumbai Positivity Rate ) दर 29.90% इतका नोंदविण्यात आला असून, चाचणी केलेल्या 67,000 नमुन्यांपैकी 20181 नमुने पॉझिटिव्ह आढळले असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता चिंतेचं वातावरण वाढलं आहे. सध्या या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये (Restriction) वाढ करण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल 36,265 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 13 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.08 % एवढा आहे. राज्यात काल गुरुवारी 26,538 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 8 करोना बाधित रुग्णांच्या मृत्याची नोंद झाली होती. आज त्यात प्रचंड मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. (Maharashtra Records 36,265 New Corona Cases On Thursday )

ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO

सध्या जगभरात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील पॉझिटिव्ह रेट (India Positivity Rate) वाढला असून ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन हा सौम्य आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, ओमिक्रॉनला सौम्य म्हणणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

ओमिक्रॉन रुग्णांना डेल्टाच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याचा धोका कमी दिसत असला तरी ओमिक्रॉन ''फक्त सौम्य'' आहे, असं म्हणणं घातक ठरू शकतं. धोका कमी असतानाही पॉझिटिव्हीटी रेट धक्कादायक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.

WHO ने यापूर्वीच दिला होता इशारा

जागतिक (WHO) आरोग्य संघटनेने सर्व देशांना ओमिक्रॉनबाबत (Omicron) सूचना दिल्या होत्या. तसेच ओमिक्रॉनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल. त्याविरोधात उपाययोजना करण्यास देखील डब्लूएचओने सांगितलं होतं. तसेच कार्यक्रम आणि मेळावे देखील रद्द करण्यास सांगितले होते. पण, भारतात याविरोधात स्थिती दिसतेय. अजूनही सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT