Covid-19 esakal
महाराष्ट्र बातम्या

सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय; 'या' बड्या शहरांत सर्वाधिक कोविडचं संक्रमण

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. 5 जून रोजी पुण्यात कोविड-19 च्या (Covid-19) नवीन संसर्गामध्ये 50 टक्क्यांनी वाढ झालीय. 23-29 मे या कालावधीत 357 नवीन संसर्ग झाल्यामुळं 30 मे ते 5 जून या कालावधीत ही संख्या 538 वर पोहोचलीय, असं आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटलंय.

राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या अहवालात असं दिसून आलंय की, महाराष्ट्रात सर्वाधिक कोविडचं संक्रमण मुंबई, पुणे आणि ठाणे शहरांमध्ये (Mumbai, Pune and Thane) आहे. गेल्या आठवड्यात नवीन कोविड-19 प्रकरणांपैकी 68 टक्के एकट्या मुंबईतील आहेत, तर किमान 17 टक्के ठाण्यातील आणि 7.42 टक्के पुण्यातील आहेत. एकूणच, राज्यातील सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या 23-29 मे दरम्यान 3,142 वरून 30 मे ते 5 जून या कालावधीत 7,253 वर पोहोचलीय.

मुंबईत 5 जूनपर्यंत कोविड संसर्गाची 4,880 सक्रिय प्रकरणं आहेत, त्यानंतर ठाण्यात 960 आणि पुणे जिल्ह्यात 501 आहेत. 5 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 5,888 प्रकरणांपैकी किमान 4.3 टक्के रूग्णालयात दाखल आहेत. गंभीर लक्षणे असलेले 61 रुग्ण असून 46 अतिदक्षता विभागात दाखल आहेत. राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं की दररोज 25,000-30,000 चाचण्या घेतल्या जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचा साप्ताहिक सकारात्मकता दर 4.7 टक्के असून मुंबईनं आधीच 8.82 टक्के कोविड पॉझिटिव्हिटी दरासह राज्य सरासरी ओलांडलीय. तर, पुण्यात कोविडचा 4.39 टक्के प्रादुर्भाव आहे.

पीएमसीचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr Ashish Bharati) यांनी कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास पुरेशी तयारी करण्याचं आश्वासन दिलंय. "पुणे महानगरपालिका संचालित रुग्णालयांमध्ये किमान 800-900 खाट आहेत. तर, शहरात दररोज 1,000-1200 चाचण्या घेतल्या जात आहेत. कारण, नवीन रुग्णांची संख्या थोडीशी वाढलीय."

अलीकडेच, पुणे जिल्ह्यात नवीन कोविड रुग्णांची संख्या 100 च्या पुढं गेली असून आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय. जिल्ह्यात कोविड संसर्गाची लक्षणं सौम्य आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या व्यक्तींना सतर्क राहण्यासाठी दवाखान्यात निर्देश जारी करण्यात आले आहेत, असं डॉ. भारती यांनी सांगितलं. साथीच्या आजाराच्या सुरुवातीपासून पुणे जिल्ह्यातील 14.56 लाख कोविड-19 रुग्णांपैकी 6.63 लाख रुग्ण हे शहरातील आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील 19,680 मृत्यूंपैकी 9,352 मृत्यू हे शहरातील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT