India’s First Double Decker Bus: मुंबई म्हटलं की सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रेल्वेचं विस्तारलेलं जाळं. ७ बेटांनी मिळून तयार झालेलं हे शहर लोकल रेल्वेच्या साहाय्यानेच धावते. मुंबईतील रेल्वे सेवा जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढीच चर्चाच बेस्टची देखील होते. एकेकाळी या बेस्ट बसच्या जीवावरच मुंबई धावत होती, असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. मात्र, अगदी घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम्पपासून ते इलेक्ट्रिक डबल डेक्कर बसपर्यंत बेस्टचा प्रवास मोठा आहे.
आजपासून बरोबर ८५ वर्षांपूर्वी देशातील पहिली डबल डेक्कर बस धावू लागली होती. डबल डेक्कर बसची सुरुवात १९३७ ला झाली. या हटके बस त्यावेळी विशेष चर्चेत आल्या होत्या. डबल डेक्कर बसच्याआधी बेस्ट सेवा सुरु झाली होती. बेस्टची सेवा १५ जुलै १९२६ ला झाली. ही केवळ मुंबईच नाही तर देशातील पहिली बस सेवा होती. मात्र, त्याआधीही मुंबईसाठी ट्रान्सपोर्ट सेवेची कल्पना समोर आली होती.
अमेरिकेतील गृहयुद्धाचा बसला होता बेस्टला फटका
मुंबई शहर हे ब्रिटिशाच्या काळाापासूनच व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे या शहरात सार्वजनिक ट्रान्सपोर्ट सेवा असावी, अशी कल्पना सर्वात प्रथम वर्ष १८६५ मध्ये समोर आली आहे. एका अमेरिकन कंपनीने ही संकल्पना मांडली होती. कंपनीने घोड्यांद्वारे ओढल्या जाणाऱ्या ट्राम्प सेवेसाठी अर्ज केला होता. कंपनीला सार्वजनिक सेवेसाठी परावनगी देखील देण्यात आली. परंतु, ही सेवा मात्र त्यावेळी सुरू होऊ शकली नाही. यासाठी अमेरिकेत सुरू असलेले गृहयुद्ध कारणीभूत ठरले होते.
अमेरिकेत गृहयुद्ध सुरू असताना तेथील उद्योग-धंदे डबघाईला आले होते. यावेळी मुंबईतून जगभरात मोठ्याप्रमाणात कापूस आणि कापडाचा पुरवठा करण्यात आला. गृहयुद्धाचा फायदा घेत मुंबईची अर्थव्यवस्था भरभराटीला आली होती. परंतु, अमेरिकन गृहयुद्ध थांबताच याचा फटका शहराला बसण्यास सुरुवात झाली. मुंबईत आर्थिक मंदी पसरली. यामुळे मुंबईत बेस्ट सेवा सुरू करण्याची कल्पना काही कालावधीसाठी रखडली.
हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
१८७३ साली सुरू झाली सेवा
अमेरिकन गृहयुद्धामुळे रखडलेली सार्वजनिक वाहतुकीची सेवा अखेर १८७३ मध्ये सुरू झाली. याच वर्षी बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. त्याच्याच पुढच्यावर्षी १८७४ ला घोड्यांद्वारे ओढल्या जाणाऱ्या ट्राम्प सेवेची सुरुवात झाली. पुढे १९०५ ला इलेक्ट्रिक ट्राम्प आणि बस सेवा नागरिकांसाठी उपलब्ध झाली.
थोडसं डबल डेक्कर बसबद्दल..
वर्ष १९३७ मध्ये आजच्याच दिवशी सर्वात प्रथम डबल डेक्कर बस भारतीय रस्त्यांवर धावली होती. परंतु, या डबल डेक्करचा इतिहास थोडा मागे जातो. जगाचा विचार केला तर १८२८ मध्ये एका फ्रेंच माणसाने डबल डेक्कर बसची कल्पना सर्वात प्रथम समोर आणली. अखेर १८२९ मध्ये घोड्यांच्या साहय्याने ओढल्या जाणाऱ्या डबल डेक्कर बस रस्त्यावर धावू लागल्या. पुढे काही वर्षांनी मोटारच्या साहाय्याने धावणाऱ्या डबल डेक्कर बस देखील रस्त्यांवर दिसू लागल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.