Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकारनं घरात कोंडून ठेवलं, मला धक्काबुक्की केली

सकाळ डिजिटल टीम

कऱ्हाड (सातारा) : मुश्रीफांविरोधात आणखी एक घोटाळा उघडकीस आणू, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते कोल्हापूरला येत असतानाच, कऱ्हाडमध्ये त्यांना पोलिसांनी उतरवलं. कोल्हापूरला जात असताना तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना कऱ्हाडात पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमय्या यांनी कऱ्हाडमध्ये आज पत्रकार परिषद घेतली.

सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यामुळे किरीट सोमय्यांना अंबाबाईचं दर्श घेता आलं नाही. ठाकरे सरकारनं नव्या इतिहास रचला असून घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली जात आहे. देशाच्या लोकशाहीत गेल्या ७५ वर्षात असं कधीच घडलं नाही. २७०० पेजेसचे पुरावे घेऊन कोल्हापुरात तक्रार दाखल करायची आहे, असं पोलिसांना कळवलं होतं, तर तक्रारदारालाच तक्रार करण्याआधी रोखण्यात आलं. मला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांना विचारायचं आहे, की तुम्ही आपल्या पोलिसांना कोणत्या आदेशाअतंर्गत गणेश विसर्जनापासून मला वंचित ठेवण्याचं कारस्थान केलंत, ते आधी जाहीर करावं. मला घरच्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं. २०० पोलिस बाहेर होते. त्यांना हात जोडून वकिलांनी प्रार्थना केली आणि ऑर्डर दाखवा अशी विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी मला परवानगी दिली. ही ठाकरे सरकारची ठोकशाही असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर मला धक्काबुक्कीही करण्यात आलीय, असा आरोप सोमय्यांनी केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT