Yashwant Dev 
महाराष्ट्र बातम्या

मराठी संगीतविश्वातील 'देव' हरपला; यशवंत देव यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव (वय 91) यांचे आज (मंगळवार) पहाटे दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.  

यशवंत देव यांची गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांना चिकनगुनिया आणि न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. काही दिवसांपूर्वीच जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. एक मूत्रपिंड खराब झाल्याने त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. अखेर त्यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

मराठी संगीतविश्वातला देव हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. अभंग, भावगीत, लोकगीत अशी अनेक गाणी त्यांनी रचली आणि त्याला संगीतही दिले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे. यामध्ये 'तुझे गीत गाण्यासाठी', 'भातुकलिच्या खेळामधली', 'तुझे गीत गाण्यासाठी', 'जीवनात ही घडी अशीच राहू दे', 'या जन्मावर या जगण्यावर', 'अखेरचे येतील माझ्या', 'कुठे शोधीसी रामेश्वर' अशा गाण्यांचा समावेश आहे. आकाशवाणीवरून त्यांनी संगीत कारकिर्दीला सुरवात केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलीसात तक्रार दाखल, दोघेजण ताब्यात

Kalyna Rural Assembly Election : तोतया पोलिसांची ग्रामीण मध्ये दहशत! कल्याण ग्रामीण मधील मनसेची शाखा बंद केली

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

SCROLL FOR NEXT