मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) प्रलंबित मागण्यांकडे (demands) राज्य सरकारने (mva government) दुर्लक्ष केलं असून, अल्प पगारामुळे आर्थिक विवंचनेतून (financial crisis) आतापर्यंत तब्बल 25 एसटी कर्मचाऱ्यांनी आपली जीवनयात्रा (life) संपवली आहे. त्यामुळे आतातरी दिवाळीपूर्वी (Diwali Festival) प्रलंबित मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्या अन्यथा 2 नोव्हेंबर पासून राज्यभरात राज्यभरात कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा (Strike Warning) दिला आहे.
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा दर एक टक्के वाढवणे, घरभाडे भत्ता दर 8, 16, 24 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 28 टक्के दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट झाली आहे.
त्यानंतर आता कोरोनाच्या महामारीमुळे एसटीचे उत्पन्न कमी होऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळोवेळी प्रलंबित राहिले आहे. सणासुदीच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचीत राहावे लागत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी प्रलंबित मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण कराव्या, अन्यथा राज्यभरात कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी इशारा दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.