prasad lad sakal media
महाराष्ट्र बातम्या

"एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका"

प्रसाद लाड यांची सरकारला विनंती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शेतकरी आत्महत्यांचे (farmers suicide) पाप डोक्यावर असताना राज्य सरकारने (mva government) आता आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे (st employees suicide) पाप डोक्यावर घेऊ नये, अशी कळकळीची विनंती भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केली आहे.

वेतन वेळेवर मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 1999 नंतर राज्यात सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले होते. त्यासंदर्भात लाड यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुळात शेतकरी आत्महत्या हेदेखील काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे. 1999 नंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग झाले.

त्याचबरोबर आपल्या तुंबड्या भरण्याच्या तत्कालीन सत्ताधारी नेत्यांच्या वृत्तीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान खालावून त्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. एकीकडे नेत्यांची वाढती संपत्ती व दुसरीकडे नागरिकांची दुरवस्था हे जनतेच्या डोळ्यात येऊ नये म्हणून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी विषारी जातीय प्रचार महाराष्ट्रात सुरु केला. अशाप्रकारे त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली व आताही एसटी कर्मचाऱ्यांबाबत महाविकास आघाडी हेच धोरण वापरीत आहे, असे लाड यांनी दाखवून दिले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटी तोट्यात गेल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे खासगी उद्योगसमूहांचा नफा गगनाला भिडत असताना, सरकारने कल्पकता दाखवली असती तर एसटी तोट्यात जाण्याचे काहीच कारण नव्हते. एकीकडे खासगी वाहतूकसेवा, मग त्या लक्झरी असोत वा ओला-उबेर असोत, वेगाने फोफावत असताना एसटी देखील चांगला नफा मिळवू शकते. मात्र सरकारलाच एसटी चालविण्याची इच्छाशक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. दूर डोंगरदऱ्यांमध्ये गावोगावी जाणारी एसटी बंद पडून चालणारच नाही. अशा स्थितीत निदान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान द्यावे व कोणत्याही परिस्थितीत यापुढे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आवाहनही लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT